नेमिनाथ जैन विद्यालयात शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा
By admin | Published: August 30, 2016 12:02 AM2016-08-30T00:02:15+5:302016-08-30T00:22:36+5:30
नेमिनाथ जैन विद्यालयात शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा
चांदवड : येथील नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात शाडू मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरणाचे नुकसान होणार नाही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्यशाळा घेण्यात आली. यात १२१ विद्यार्थ्यांनी आपली स्मरणशक्ती, कल्पकता व कौशल्याचा वापर करून मातीच्या गोळ्यापासून गणेशमूर्तींचा पाट तयार करून, मूर्तींचे विविध अवयव तयार करण्यात आले. नंतर बांबूच्या कोरण्याचा वापर करून मूर्तींना सुबक आकार देत उत्साहात काम करून आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. कलाशिक्षक के. व्ही. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून मार्गदर्शन केले, तर प्राचार्य यू. बी. कुलकर्णी यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेसाठी हरित सेना विभागप्रमुख आर. एन. नेरकर, एन. एन. निकम, ग्रंथपाल पी. व्ही. गोऱ्हे, आर. पी. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस. यू. समदडिया, पर्यवेक्षक एम. टी. सोनी, विभागप्रमुख सी. डी. निकुंभ आदि उपस्थित होते.
वाहेगाव साळ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात साकारल्या गणेशमूर्ती
तळेगाव रोही : तालुक्यातील वाहेगाव साळ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कलाशिक्षक व्ही. जे. खैरनार यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले, तर विद्यार्थ्यांनी गणेशाची अनेक रूपे साकारली. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. शिक्षक व्ही. डी. पाटील, एस. एम. जाधव यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक के. डी. देवढे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.