छाया बैरागी यांना राज्य शासनाचे रजक पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 08:06 PM2019-07-06T20:06:32+5:302019-07-06T20:07:06+5:30
कनाशी : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन काम प्रभावीपणे करीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने कर्मचारी छाया बैरागी यांना शासनानी रजक पदक देवून सन्मानित करण्यात आले.
कनाशी : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन काम प्रभावीपणे करीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने कर्मचारी छाया बैरागी यांना शासनानी रजक पदक देवून सन्मानित करण्यात आले.
1 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर येथे वनरक्षक छाया बैरागी यांना रजक पदक देवून गौरव करण्यात आला. शासनाच्या 15 जून रोजी शासन निर्णय नुसार पदक जाहिर करण्यात आले. छाया बैरागी यांनी कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयात सन 2017/18 मध्ये उत्सकृत कामिगरी केल्याबद्दल रजक पदक देवून सन्मानित करण्यात आले. वनविभागाचे नाशिक पुर्वचे उपवनसरंक्षक तृषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे,वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील, वनपाल शशिकांत वाघ यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र शासनाच्या 23 अधिकारी व कर्मचारी यांना शासनाचे सुर्वण व रजक पदक जाहिर झाले.त्यात नाशिक विभागात व वनविभागातून एकमेव महिला कर्मचारी छाया बैरागी आहेत.