शहीद अब्दुल हमीद चौकाला नामफलकाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:56 AM2017-08-13T00:56:24+5:302017-08-13T00:56:31+5:30

नाशिक : जुने नाशिकमधील पिंजारघाट येथील मुख्य चौक शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने वर्षानुवर्षांपासून ओळखला जातो. मात्र, मागील पाच वर्षांपासून या चौकामध्ये शहिदांच्या नावाने फलक उभारण्यासाठी महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर तरी पालिक ा या चौकात फलक उभारून अब्दुल हमीद यांना अभिवादन करेल का? असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Shaheed Abdul Hamid Chouk | शहीद अब्दुल हमीद चौकाला नामफलकाची प्रतीक्षा

शहीद अब्दुल हमीद चौकाला नामफलकाची प्रतीक्षा

googlenewsNext

नाशिक : जुने नाशिकमधील पिंजारघाट येथील मुख्य चौक शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने वर्षानुवर्षांपासून ओळखला जातो. मात्र, मागील पाच वर्षांपासून या चौकामध्ये शहिदांच्या नावाने फलक उभारण्यासाठी महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर तरी पालिक ा या चौकात फलक उभारून अब्दुल हमीद यांना अभिवादन करेल का? असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
शहरातील रिंगरोडपासून सर्वच मध्यवर्ती भागांसह उपनगरांमधील महत्त्वाच्या रस्त्यांवर महापालिकेच्या वतीने नवीन मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र, जुने नाशिकमधील या शहीद चौकाची नामफलकाविना उपेक्षा कायम असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहीद हमीद यांचे शौर्य व बलिदानाचा पालिका प्रशासनाला विसर पडल्याचे बोलले जात आहे. वारंवार मागणी करून व याबाबतीत लक्ष वेधूनदेखील या चौकात फलक बसविला जात नसल्याने तीव्र आश्चर्य व्यक्त होत आहे. रिंगरोडसह महत्त्वाच्या रस्त्यांवर मार्गदर्शक भव्य कमानी, अन्य रस्त्यांवर नवीन मार्गदर्शक फलक, वाहतूक बेटांमध्येही रस्त्यांची दिशा दाखविणारे नामफलक पालिकेने झळकविले आहे. एकीकडे शहरात सर्वत्र नामफलक, मार्गदर्शक फलक झळकत असताना जुने नाशिकमधील शहीद अब्दुल हमीद चौकाला मात्र नामफलकाची प्रतीक्षा कायमच आहे, हे दुर्दैव!शहीद अब्दुल हमीद यांचे शौर्य१९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धात पंजाबच्या तारन जिल्ह्यात खेमकरण क्षेत्रात सज्ज असलेले वीर अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानचे ‘अमेरिकन पॅटर्न टॅँक’ उद्ध्वस्त केले होते. ‘गन माउंटेंड जीप’ जी टॅँकसमोर एखाद्या खेळणीसारखी होती; मात्र अब्दुल हमीद यांनी धैर्याने या जीपद्वारे एक-दोन नव्हे तर तब्बल सात टॅँक नष्ट केले. पळकुट्या पाक सैन्याचा पाठलाग करताना अब्दुल हमीद यांच्या जीपवर बॉम्बगोळा येऊन आदळला. यामध्ये ते जखमी झाले आणि १० सप्टेंबर १९६५ साली वयाच्या ३२ वर्षी त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Shaheed Abdul Hamid Chouk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.