शाहीर एकनाथ गोरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:51+5:302021-06-28T04:11:51+5:30
त्यांनी शाहिरी व जलसा यांच्या माध्यमातून पुरोगामी विचारांचे, जनजागृतीचे कार्य बालवयापासून सुरू केले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ...
त्यांनी शाहिरी व जलसा यांच्या माध्यमातून पुरोगामी विचारांचे, जनजागृतीचे कार्य बालवयापासून सुरू केले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांच्या माध्यमातून पुरोगामी विचारांचे तसेच अण्णा भाऊ साठे यांची कवणे ते गात असत. अण्णा भाऊ साठे यांची ढोलकी (नाल) त्यांनी संचात जतन केलेली आहे. संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीतही त्यांनी जलशाच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांना त्यावेळी काॅम्रेड पुंजाबाबा गोवर्धने, कॉम्रेड माधवराव गायकवाड, ॲड. विठ्ठलराव हांडे यांचा सहवास लाभला.
अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी वेळोवेळी शेतकरी, आदिवासी व श्रमिकांच्या आंदोलनात हिरिरीने सहभाग नोंदवला होता. अखेरपर्यंत त्यांनी पुरोगामी विचारांचा धागा जपला.
फोटो- २७ एकनाथ गोरे
===Photopath===
270621\27nsk_41_27062021_13.jpg
===Caption===
फोटो- २७ एकनाथ गोरे