...यंदा शहाजहांनी ईदगाह गजबजणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:13 PM2020-05-18T19:13:55+5:302020-05-18T19:16:40+5:30

रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे.

... ShahJahani Eidgah will not be celebrating this year | ...यंदा शहाजहांनी ईदगाह गजबजणार नाही

...यंदा शहाजहांनी ईदगाह गजबजणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देनमाजपठणाचा सामुहिक सोहळा रद्दगर्दी टाळा, कोरोनाला संपवा

नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण म्हणून ओळखला जाणारा ‘ईद-उल-फित्र’ अर्थात रमजान ईद अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे; मात्र यंदा कोरोनासारख्या भयंकर आजाराचे सावट ईदवर आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे शहरातील शहाजहांनी ईदगाह मैदानावर होणारा ईदच्या खास नमाजपठणाच्या पारंपरिक सोहळा यंदा पहावयास मिळणार नाही. कारण केंद्र व राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, उत्सव रद्द करण्याचे आदेश येत्या ३१ तारखेपर्यंत देण्यात आले आहेत.

कोरोना आजाराच्या संकटामुळे संपुर्ण रमजान पर्व यंदा जेमतेम उत्साहात पार पडले. बाजारपेठा फारशा गजबजलेल्या दिसल्या नाहीत. कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मागील दीड महिन्यांपासून ‘लॉकडाउन’ घोषित केले गेले आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी राज्यासह देशभरात वाढविला गेला आहे. येत्या २४ मे रोजी मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची सांगता होणार आहे. २५ तारखेला सोमवारी रमजान ईद साजरी केली जाईल. तत्पुर्वी २३ तारखेला रमजानच्या २९ व्या उपवासाच्या संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत घोषणा झाली तर कदाचित रविवारी (दि.२४) रमजान ईद साजरी केली जाऊ शकते.
एकूणच रमजान ईदचा मोठा सण अवघ्या पाच ते सहा दिवसांवर आला आहे; मात्र यावर्षी शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह प्रमुख धर्मगुरू व उलेमांनीदेखील ईद यंदा अगदी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ज्याप्रमाणे रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे.


गर्दी टाळा, कोरोनाला संपवा...
ईदनिमित्त यंदा बाजारपेठांमध्ये गर्दी उसळणार नाही, याची संपुर्ण काळजी समाजाने घ्यावयाची आहे, कारण त्याशिवाय कोरोनाला नष्ट करणे शक्य होणार नाही. यामुळे यंदा ईदच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नये, असे आवाहन आठवडाभरापासून सोशलमिडियाद्वारे केले जात आहे. याबाबत सुन्नी मरकजी सिरत समितीकडून आवाहन पत्रकदेखील खतीब यांनी प्रसिध्द केले आहे.

शहाजहांनी ईदगाहवरील नमाजपठणाचा सामुहिक सोहळा शासनाच्या नियमानुसार होऊ शकत नाही. तसेच मशिदीदेखील बंदच राहणार आहेत. यंदा समाजबांधवांनी आपआपल्या घरांमध्ये राहूनच नमाजपठण (शरियतनुसार) करत ईद साजरी करावी. जेव्हा कोरोनाचे संकट आपल्या शहरातून अन् देशातून दूर होईल तेव्हा आपली खऱ्या अर्थाने ‘ईद’ होईल.
- हाफीज हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-खतीब, नाशिक

Web Title: ... ShahJahani Eidgah will not be celebrating this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.