हरसूलच्या कन्या छात्रालयाला शाहू छत्रपती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:33 PM2020-10-01T23:33:00+5:302020-10-02T01:08:07+5:30
नाशिक : पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील विश्व हिंदू परिषद आणि वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास संचलित कन्या छात्रालयाला प्रदान करण्यात आला आहे.
नाशिक : पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील विश्व हिंदू परिषद आणि वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास संचलित कन्या छात्रालयाला प्रदान करण्यात आला आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी चे प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी शिक्षण, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या राष्ट्रीय स्तरावरील नामवंत व्यक्ती किंवा संस्था यांचा सन्मान या पुरस्काराने केला जातो. यंदाचा पुरस्कार कन्या छात्रालयाला प्राप्त झाला आहे. १ लाख रु पये रोख, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्सिस्टन्स सिस्टिम लिमिटेड चे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे उपस्थित होते. यावेळी डॉ. देशपांडे यांनी पुरस्काराच्या रकमेव्यतिरिक्त आणखी एक लाख रु पयांचा धनादेश संस्थेला देण्याचे जाहीर केले. कार्यक्र मास संस्थेच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, फर्गसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, कन्या छात्रालयाचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, सचिव अॅड. विनित महाजन, कोषाध्यक्ष प्रा. हेरंब गोविलकर, छात्रालय पालक पदाधिकारी अॅड. श्याम घरोटे उपस्थित होते.
इन्फो
आॅनलाइन सोहळा
पुरस्कार वितरण सोहळा आॅनलाइन पध्दतीने संपन्न झाला. गेल्या ३९ वर्षांपासून ह्या छात्रालयाच्या माध्यमातून ७०० हून अधिक वनवासी क्षेत्रातील विद्यार्थिनींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. कन्या छात्रालयाचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांनी छात्रालयाच्या स्थापने पासूनची माहिती दिली तर सचिव अॅड. विनित महाजन यांनी भावी प्रकल्पांची माहिती दिली.