देवळा येथे शाकंभरी पौर्णिमा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 02:04 PM2020-01-11T14:04:03+5:302020-01-11T14:04:10+5:30
देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.
देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या सांगता प्रसंगी २४ दुर्मिळ कंदमुळे, रानभाज्या व भाजीपाला एकत्र करून तयार केलेल्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. गतवर्षी १२५ भाज्यांचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. प.पू. गुरूमाउली स्वर्गीय शिवानंद महाराज यांच्या प्रेरणेतून ग्रामदैवत दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव सुरू करण्यात आला होता. दरवर्षी तो मोठया उत्साहाने साजरा केला जात आहे. हया वर्षी ३ ते १० जानेवारी या कालाविधत हा उत्सव साजरा करण्यात आला.उत्सव काळात शोभायात्रा, सत्संग, नवचंडीयाग, दुर्गा सप्तक्षती पाठ आदी कार्यक्र म झाले. भाविक महीलांनी उत्सव काळात नित्यनियमाने सप्तक्षती पाठाचे पारायण केले. शेवटच्या दिवशी दिनेशिगरी महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्र म झाला. यावेळी स्व. शिवानंद महाराज यांची पत्नी शकुंतला पाटील, . मनिषा दिदी, दिपक पाटील, पुरोहित राहुल वाघमारे आदींना सत्संग सेवा समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
शोभायात्रेने उत्सवास प्रारंभ होउन अखेरच्या दिवशी महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी वराह कंद, नवल कंद, बांबू कंद,कमळ कंद, चंदन वाटवा, चांदणी वेल, रूद्राक्ष, फणस, पुनर्नवा, राजहंस,कुशमाडा, केतकी फुल,काचीन फुल आदी दुर्मिळ कंदमुळे, रानभाज्या, व भाज्यांसह 127 प्रकारचा भाजीपाला जमा करून त्याची एकित्रत भाजी महाप्रसादासाठी करण्यात आली होती. ह्या तयार केलेल्या महाप्रसादाचा लाभ पंचक्र ोशीतील हजारो नागरिक तसेच महीलांनी घेतला.देवळा येथे शाकंभरी पौर्णिमेचा साजरा केला जाणारा हा उत्सव त्याच्या विशिष्ठ पद्धतीने तयार करण्यात येणार्या महाप्रसादामुळे सर्वदूर प्रसिद्ध झाला असून कसमादेसह जिल्हाभरातून हजारो भाविकांनी हया उत्सवाला हजेरी लावली. शाकंभरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन ग्रामस्थ, व सत्संग सेवा समतिी देवळा यांच्या वतीने करण्यात आले होते.