नस्तनपूर येथे शनिदेव यात्रोत्सवास गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 10:52 PM2019-01-05T22:52:33+5:302019-01-05T22:55:00+5:30
न्यायडोंगरी : शनि अमावास्येनिमित्त श्री क्षेत्र नस्तनपूर येथे शनिदेवाची यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने हजारो भाविकांनी शनि देवाचे दर्शन घेतले.
न्यायडोंगरी : शनि अमावास्येनिमित्त श्री क्षेत्र नस्तनपूर येथे शनिदेवाची यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने हजारो भाविकांनी शनि देवाचे दर्शन घेतले.
आज प्रथमच दुपारची महाआरती पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर म्हणजेच रांगेत उभे असलेल्या दांपत्याच्या हस्ते करण्यात आली. या आरतीचा मान जळगाव जिल्ह्यातील गणेशपूर येथील नयनसिंह प्रल्हाद देवरे व विजया नयनसिंह देवरे या दांपत्यास मिळाला. त्यांच्या सोबत विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता आहेर व त्यांचे सुपुत्र दर्शन आहेर आरती सोहळ्यात सहभागी झाले. त्यात ठिकठिकाणी पिण्यासाठी पाणी, वैद्यकीय सेवा, माहिती केंद्र, सुरक्षाव्यवस्था या क्षेत्राची संपूर्ण माहिती व आख्ख्यायिका असलेले डिजिटल फलक, चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग, उद्घोषणा कक्ष, दर्शन रंगासाठी भव्य व भक्कम बॅरिकेटिंग, मुखदर्शन सुविधा, अभिषेकासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रवासी रेल्वेचा एक दिवसासाठी थांबा व तिकिटाची सोय, पोलीस बंदोबस्त, संगणकीय देणगी कक्ष, विविध खाद्य पदार्थ, पूजा साहित्य व प्रसादाची शिस्तबद्ध पद्धतीने लावलेली दुकाने, नवस पूर्तीसाठी तात्पुरती पत्र्याचे शेड, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातून येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग, अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ने इतक्या मोठ्या संख्येने जनसमुदाय येऊनही कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरळीत पार पडल्याने प्रशासनाने व संस्था चालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.