शंकराचार्य पुरस्कार प्रदान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:48 AM2019-05-12T00:48:01+5:302019-05-12T00:48:21+5:30
सध्याच्या काळात संपूर्ण विश्वात थोरपणा मिरविण्यापेक्षा विश्वाची सेवा करून थोरपणा मिळवा, असे मत जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपापात्र शिष्य माधवगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
पंचवटी सध्याच्या काळात संपूर्ण विश्वात थोरपणा मिरविण्यापेक्षा विश्वाची सेवा करून थोरपणा मिळवा, असे मत जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपापात्र शिष्य माधवगिरी महाराज यांनी व्यक्त केले. त्र्यंबकेश्वरनजीक वाढोली येथील शिवशक्ती ज्ञानपीठ येथे माधवगिरी महाराज यांना श्री भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माधवगिरी म्हणाले जनार्दन स्वामींचे कार्य अथांग सागराएवढे आहे. त्रिकाल संध्या करून हिंदू धर्मातील वेद विद्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उदात्त हेतू जनार्दन स्वामी यांचा असल्यामुळे मला मिळालेला हा पुरस्कार खऱ्या अर्थाने पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर मान्यवरांनी सत्कारमूर्ती माधवगिरी महाराज यांना आशीर्वादरूपी शुभेच्छा प्रदान केल्या. जनार्दन स्वामी गुरूमाउलींचा आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी स्वामी स्वरूपानंद सरस्वती, सागरानंद सरस्वती, स्वामी संविदानंद, डॉ. मो. स. गोसावी, प्रकाश पाठक, रवींद्र सपकाळ, वेदमूर्ती उमेश टाकळीकर, एस. टी. देशमुख, मोहन चव्हाण, स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी, संतोषगिरी, जयरामगिरी, महेशगिरी, भाऊ पाटील आदींसह समस्त जय जनार्दन भक्त मंडळ उपस्थित होते.
पुस्तकाचे प्रकाशन
श्रुतीसागर आश्रम, पुणे आणि शिवशक्ती ज्ञानपीठ नाशिक यांच्या वतीने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारा श्री भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्कार तपोवन येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे माधवगिरी महाराज यांना प्रदान करण्यात आला. यावेळी योगवसिष्ठ मुमुक्षुव्यवहार पुस्तकाच्या दुसºया अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.