शांतिगिरी महाराज यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:10 AM2018-11-23T00:10:25+5:302018-11-23T00:10:48+5:30

चांदवड : शहरातून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिनी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे चांदवडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Shanti Shigri Maharaj's procession | शांतिगिरी महाराज यांची मिरवणूक

शांतिगिरी महाराज यांची मिरवणूक

Next
ठळक मुद्देचांदवड : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

चांदवड : शहरातून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिनी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे चांदवडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांची सजविलेल्या रथातून आठवडे बाजारमार्गे सोमवार पेठ येथून शिवाजी चौक, रंगमहाल, वरचेगाव मार्गे, रेणुका माता मंदिरापर्यंत सवाद्य पालखी मिरवणूक यावेळी काढण्यात आली.
प्रारंभी सकाळी स्वामी शांतिगिरी महाराज यांचे बसस्थानकाजवळ डॉ. राजेंद्र दवंडे यांच्या हॉस्पिटल येथे आगमन झाले तेव्हा त्यांचे स्वागत व पूजन करण्यात आले तर बाळासाहेब होनराव यांनी पूजन केले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. राजेंद्र दवंडे, बाळासाहेब होेनराव, गणेश गवळी, तालुकाध्यक्ष अशोक साळुंके, राजाभाऊ शेलार, दीपक शेलार, किरण दवंडे आदींसह तालुका जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मिरवणुकीच्या शेवटी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जगताप, अनिल केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. बैठकीनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.चांदवडला बैठकमिरवणुकीत भजनी मंडळ, भाविक उपस्थित होते तर दि. १२ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत वेरूळ येथे जगद्गुरु जनार्दनस्वामी महाराज यांच्या २९ व्या पुण्यस्मरणार्थ निमंत्रण देण्याबाबतची चांदवड तालुक्याची बैठक येथील श्री रेणुका देवी मंदिरात आयोजित केली.

 

 

Web Title: Shanti Shigri Maharaj's procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक