नाशिकमध्ये आनंदीआनंद! निवडणूक लढणार शांतिगिरी महाराज अन् स्वामी कंठानंद
By संजय पाठक | Published: January 30, 2024 10:35 AM2024-01-30T10:35:43+5:302024-01-30T10:37:16+5:30
बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतिगिरी महाराजांचा मोठा नाशकात अनुयायी वर्ग असून त्यांनी मध्यंतरी नाशिकच्या तपोवन येथे मोठा यज्ञ याग केला होता.
नाशिक- लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असून नाशिक लोकसभेच्या रणांगणातून उतरण्यासाठी अनेक दावेदार आता पुढे येऊ लागली आहे. त्यात श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे अनुयायी परमपूज्य शांतिगिरी महाराज त्याचबरोबर नाशिकचे स्वामी कंठानंद यांनी देखील तयार केली आहे.
बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतिगिरी महाराजांचा मोठा नाशकात अनुयायी वर्ग असून त्यांनी मध्यंतरी नाशिकच्या तपोवन येथे मोठा यज्ञ याग केला होता. तर दुसरीकडे स्वामी कंठानंद त्यांच्या श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांच्या माध्यमातून 2005 पासून सेवा कार्य करीत आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी नाशिकमधील काही प्रमुख व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील पाठवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे आपणही अप्रपंचिक असून त्यामुळे आपण भाजपातून उमेदवारीसाठी योग्य असल्याचा दावा स्वामी कंठानंद यांनी केला आहे. तर नाशिकमध्ये राम राज्यासाठी आपण निवडणूक उभे राहणार निवडणूक लढवणार असल्याचे परमपूज्य शांतिगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. या पूर्वी 2009 मध्ये शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवणार होते. मात्र नंतर त्यांनी संभाजी नगर मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.