शरद पवार पुरोगामी विचारांचे तेजस्वी वारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:59+5:302020-12-13T04:30:59+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीत भुजबळ हे नाशिक येथून ...

Sharad Pawar is the brilliant heir of progressive thought | शरद पवार पुरोगामी विचारांचे तेजस्वी वारस

शरद पवार पुरोगामी विचारांचे तेजस्वी वारस

Next

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीत भुजबळ हे नाशिक येथून उपस्थित होते. या ठिकाणाहून त्यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, पवार यांचे विचार पुन्हा नव्याने महाराष्ट्राच्या दगड-मातीत रुजू लागले आहेत. कणखर विचारांचे भाले गवतांना पुन्हा दणक्यात फुटू लागले आहेत. त्यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. पण, वाढदिवस माणसांना असतो युगाला नसतो तर ते अजरामर असते, असे सांगून महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या ८०० वर्षे पुढे घेऊन गेलेले हे महायुग आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहेर, पंकज भुजबळ, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, रंजन ठाकरे, राजेंद्र जाधव, दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, सचिन पिंगळे, अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगले, गजानन शेलार, समिना मेमन, जगदीश पवार, रत्नाकर चुंभळे, विजय पवार, शरद गायधनी, नाना सोनावणे, सलीम शेख, डॉ. शेफाली भुजबळ, कविता कर्डक आदी उपस्थित होते. (फोटो १२ छगन)

Web Title: Sharad Pawar is the brilliant heir of progressive thought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.