जीएसटीतील समस्यांबाबत शरद पवार यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:10 AM2017-10-03T00:10:30+5:302017-10-03T00:11:21+5:30

चेंबर आॅफ कॉमर्स : मागण्यांचे निवेदन केले सादर नाशिक : जीएसटी लागू झाल्यानंतर महिन्यातून तीन वेळा विवरणपत्र दाखल करण्याबरोबरच अन्य अनेक समस्यांबाबत महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी राष्टÑवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या समवेत बैठक घेऊन त्यात हे विषय मांडण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

Sharad Pawar is concerned about the problems in GST | जीएसटीतील समस्यांबाबत शरद पवार यांना साकडे

जीएसटीतील समस्यांबाबत शरद पवार यांना साकडे

Next

नाशिक : जीएसटी लागू झाल्यानंतर महिन्यातून तीन वेळा विवरणपत्र दाखल करण्याबरोबरच अन्य अनेक समस्यांबाबत महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी राष्टÑवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या समवेत बैठक घेऊन त्यात हे विषय मांडण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

केंद्र सरकारने १ जुलैपासून जीएसटी लागू केला असून, त्यातील अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषत: महिनाभरात तीन तीन विवरण दाखल करण्याबाबत अडचणी येत आहेत. कागदपत्रे सांभाळावी लागत आहेत. शिवाय शासकीय कामांची देयके असली तरी ती वेळेत मिळत नसल्याने त्याबाबतही जीएसटीच्या विवरणात माहिती भरणे अडचणीचे ठरत आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स आॅफ महाराष्टÑाचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिल लोढा, सतीश बूब यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पवार यांनी सर्व अडचणींची टिप्पणी करून ती सादर केल्यास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Sharad Pawar is concerned about the problems in GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.