कृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी शरद पवार नाशकात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:42 AM2017-11-11T01:42:02+5:302017-11-11T01:43:15+5:30
कृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी खासगी दौºयावर शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार नाशिकला दाखल झाले.
नाशिक : कृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी खासगी दौºयावर शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार नाशिकला दाखल झाले.
येथील एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये त्यांचे सायंकाळी साडेसहा वाजता पदाधिकाºयांनी स्वागत केले. त्यावेळी आमदार जयंत जाधव, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, जिल्हा परिषद सभापती अपर्णा खोेसकर, यतिन पगार, नितीन पवार, जयश्री पवार, सिद्धार्थ वनारसे, तसेच जयदत्त होळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. मात्र हा दौरा खासगी असल्याचे सांगत त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. शनिवारी सकाळी साडेनऊ ते साडेबारापर्यंत ते दिंडोरी तालुक्यातील जानोरीनजीक सह्णाद्री फार्म येथे शीतगृह व तेथील योजनांची माहिती घेणार असून, यावेळी केंद्रीय कृषिसचिवही त्यांच्या समवेत राहणार असल्याचे कळते. दुपारी २ वाजता सह्णाद्री फार्मवरूनच हेलिकॉप्टरने ते पुण्याला रवाना होणार आहेत.