दमणगंगा-पिंजाळ पाण्यासाठी सोमवारी बैठक शरद पवार, जलसंपदामंत्र्यांची उपस्थिती : राजेंद्र जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:49 AM2017-10-07T01:49:40+5:302017-10-07T01:49:54+5:30

केंद्र सरकारने दमणगंगा-पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील महाराष्टÑाचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे.

Sharad Pawar, presence of water resources minister on Monday for Damanganga-Pinjal water: Rajendra Jadhav | दमणगंगा-पिंजाळ पाण्यासाठी सोमवारी बैठक शरद पवार, जलसंपदामंत्र्यांची उपस्थिती : राजेंद्र जाधव

दमणगंगा-पिंजाळ पाण्यासाठी सोमवारी बैठक शरद पवार, जलसंपदामंत्र्यांची उपस्थिती : राजेंद्र जाधव

Next

नाशिक : केंद्र सरकारने दमणगंगा-पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील महाराष्टÑाचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. यासंदर्भात महाराष्टÑाच्या हक्काच्या पाण्यासाठी महत्त्वाची दिशा ठरविण्यासाठी माजी केंद्रीयमंत्री शरद पवार व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. ९) महत्त्वाची बैठक मुंबईला आयोजित करण्यात आल्याची माहिती जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली.
रविवारी (दि.१) नाशिकला आलेल्या शरद पवार यांची भेट घेऊन जलचिंतन संस्थेच्या वतीने राजेंद्र जाधव यांनी त्यांना दमणगंगा-पिंजाळ व नार-पार लिंक योजनेद्वारे महाराष्टÑाच्या हक्काचे पाणी गुजरातला जात असल्याबाबत माहिती दिली होती.

Web Title: Sharad Pawar, presence of water resources minister on Monday for Damanganga-Pinjal water: Rajendra Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.