शरद पवार स्कूलमध्ये मल्लखांबची प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:48 PM2019-07-17T18:48:06+5:302019-07-17T18:48:16+5:30
कळवण : शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व विशद
कळवण : आधुनिक व पाश्चात्य खेळांबरोबरच भारतीय खेळांची जपवणूक व रु ची निर्माण होण्याच्या दृष्टीने शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मल्लखांब खेळाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक यशवंत जाधव तसेच आंतरराष्ट्रीय मल्लखांब खेळाडू अक्षय खानापुरे यांच्यासह इशिता पवार, अरोही कांबळे व कार्तिक मल्ले या विद्यार्थ्यांनी व शाळेचे मल्लखांब प्रशिक्षक प्रज्वल निगोट यांनी रोप मल्लखांब व मल्लखांब या दोन्हीही प्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. यशवंत जाधव यांनी विद्यार्थ्यांना या खेळाची माहिती देऊन शारीरिक तंदुरु स्तीसाठीचे महत्त्व विशद केले. तसेच संस्थेने पाश्चात्य खेळांबरोबरच भारतीय खेळांची रु ची विद्यार्थ्यांमध्ये वाढावी हा ठेवलेला दृष्टिकोन व मल्लखांब खेळ शाळेमध्ये सुरु करणे प्रशंसनीय असल्याचे सांगितले. यावेळी शाळेचे प्राचार्य बी.एन. शिंदे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या खेळात सहभागी होवून पारंगत व्हावे, ही अपेक्षा व्यक्त करून आलेल्या मान्यवरांचे व खेळाडूंचे आभार व्यक्त केले. या वेळी डॉ. चैताली पाटील, सौ. नेहा पवार तसेच शाळेचे सर्व विदयार्थी,विविध खेळांचे प्रशिक्षक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.