विरोधापेक्षा कौतुकाचे  मोठेपण दाखवायला हवे :  शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:53 AM2019-03-05T01:53:09+5:302019-03-05T01:53:43+5:30

विधिमंडळात काम करताना टीकेचे प्रसंग येतात, पण वेगळ्या विचाराच्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आदर करायची वेळ येते तेव्हा त्यास विरोध करण्यापेक्षा त्याचे कौतुक करण्याचेही मोठेपण दाखविले पाहिजे.

 Sharad Pawar should be seen more than Opposition: Sharad Pawar | विरोधापेक्षा कौतुकाचे  मोठेपण दाखवायला हवे :  शरद पवार

विरोधापेक्षा कौतुकाचे  मोठेपण दाखवायला हवे :  शरद पवार

Next

नाशिक : विधिमंडळात काम करताना टीकेचे प्रसंग येतात, पण वेगळ्या विचाराच्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आदर करायची वेळ येते तेव्हा त्यास विरोध करण्यापेक्षा त्याचे कौतुक करण्याचेही मोठेपण दाखविले पाहिजे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून असे मोठेपण शिकण्यासारखे असून, यासाठी त्यांचे विचार अगोदर वाचले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांना उद्देशून केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना शरद पवार यांच्या हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते. शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  प. सा. नाट्यमंदिर येथे आयोजित या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार अपूर्व हिरे, वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, देणगीदार डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. शोभा नेर्लीकर, किशोर पाठक, निवड समिती सदस्य शैलेंद्र तनपुरे उपस्थित होते.  यावेळी शरद पवार म्हणाले, विधिमंडळात अन्य सदस्य आहेत त्यांचा प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे. एखाद्याच्या कार्याचा गौरव करण्याची वेळ आली तर जरूर केले पाहिजे. इंदिरा गांधी सत्तेवर असताना भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी पाकिस्तानची धूळधाण केली होती.
शहीद निनादची कन्या वेदिताला मदत
पुरस्काराची ५१ हजारांची रक्कम आणि आपल्याकडील ५१ हजार रुपये अशी एक लाख रुपयांची मदत शहीद निनाद मांडवगणे यांची कन्या वेदिता हिच्या नावे करण्याची घोषणा यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. वाचनालयासाठी ५१ हजारांची आर्थिक मदतही त्यांनी यावेळी जाहीर केली.

Web Title:  Sharad Pawar should be seen more than Opposition: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.