पीकविमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळवून देणार-शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:53 PM2019-11-01T12:53:12+5:302019-11-01T12:53:39+5:30

घोटी : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोटी येथे सांगितले. टाके घोटी येथील शेतक-यांच्या शेतात जाऊन पवार यांनी पाहणी करीत शासकीय अधिकाºयांकडून अधिक माहिती घेतली. पीकविमा आणि नुकसानभरपाई हे स्वतंत्र विषय असून पीकविमा न काढलेल्या शेतकºयांंवरही कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar will get help for non-crop farmers | पीकविमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळवून देणार-शरद पवार

पीकविमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळवून देणार-शरद पवार

googlenewsNext

घोटी : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोटी येथे सांगितले. टाके घोटी येथील शेतक-यांच्या शेतात जाऊन पवार यांनी पाहणी करीत शासकीय अधिकाºयांकडून अधिक माहिती घेतली. पीकविमा आणि नुकसानभरपाई हे स्वतंत्र विषय असून पीकविमा न काढलेल्या शेतक-यांंवरही कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.  इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. खरिपाचे पीक या सततच्या पावसाने भिजून गेले आहे. कापणी करण्यात आलेले पीक अक्षरश: खराब झाले आहे. खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकरी वैफल्यग्रस्त झाले असल्याने ह्या शेतकर्यांना न्याय द्यावा, तातडीने नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांचे निवेदन पवार यांना यावेळी देण्यात आले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे,सरोज अिहरे, माजी खासदार देविदास पिंगळे आदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि पदाधिकाºयांनी निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली. माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांनी पवार यांना इगतपुरी तालुक्यातील पाऊस ह्यावर्षी प्रचंड प्रमाणात सरासरी ओलांडून झाला असल्याचे सांगून सर्व शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
------------------------------
गुळवे यांना आदरांजली
मुंबईहून शरद पवार इगतपुरी जवळील टोल नाका भागात शेतकर्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी अल्पवेळ थांबणार होते. मात्र शेतकर्यांच्या प्रश्नांवर न्याय देण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष शेतात घुसून पाहणी केली. आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्याचे दिवंगत काँग्रेस नेते गोपाळराव गुळवे यांचा आज स्मृतिदिन असल्याचे समजताच पवार यांनी बाजार समिती आवारातील गुळवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, गोरख बोडके, जनार्दन माळी, ज्ञानेश्वर लहाने, माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे, कचरू पाटील शिंदे, तहसीलदार अर्चना भाकड, तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर आदींसह शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------
वरिष्ठ स्तरावरून शासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने सर्वेक्षण करावे. नियमात अत्यल्प भरपाई देण्याची तरतूद काढून परिस्थितीशी सामना करणाºया शेतकºयांना तात्काळ भरपाई देण्यासाठी शासनाला भाग पाडू. आम्ही शेतकºयांच्या सोबत आहोत.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Sharad Pawar will get help for non-crop farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक