राज्यकर्त्यांचा पोरखेळ सुरू शरद पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 02:04 AM2019-11-02T02:04:04+5:302019-11-02T02:04:54+5:30

विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली.

Sharad Pawar's criticism of the rulers continues | राज्यकर्त्यांचा पोरखेळ सुरू शरद पवार यांची टीका

राज्यकर्त्यांचा पोरखेळ सुरू शरद पवार यांची टीका

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. शेतकरी संकटात असताना सत्तेतील लोकांनी असं वागणं बरं नव्हे असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पवार यांनी, विधानसभा निवडणुकीत जनतेने दोन्ही पक्षांना सरकार बनविण्याची संधी दिली व सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्हाला विधिमंडळात पाठविले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करावे, राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला असताना त्यांनी सरकार बनविण्याची जबाबदारी पार पाडण्याऐवजी दोन्ही बाजूंनी गेल्या आठ दिवसांपासून निव्वळ पोरखेळ सुरू आहे असे सांगणाºया पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्याला येऊन भेटून गेल्याचे सांगितले; मात्र त्या भेटीबाबत अधिक बोलण्याचे टाळले. राज्यात भाजपची भरभराट झाल्याचे आपल्याला तरी या निवडणुकीत दिसले नाही, असे सांगून पवार यांनी ‘अबकी बार २२० पार’ अशी वल्गना त्यांनी केली होती; परंतु मतदारांनी त्यांना तशी संधी दिली नसल्याचे सांगितले.
राज्यातील शेतकरी संकटात असून, अशा वेळी त्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे पण सरकार याकामी अपयशी ठरले आहे असे सांगून, संपूर्ण पीक नष्ट झाले, डोक्यावर बँकांचे कर्ज आहे, पुढचे पीक घेणे अवघड आहे अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, त्यांना एकरी नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी, शेतकºयांना पुढील पिकासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे तसेच त्यांची सर्व प्रकारची वसुली स्थगित करून त्यांना पुढील पाच ते सात वर्षाचे हप्ते बांधून द्यावेत, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने साथ दिली
विधानसभा निवडणुकीच्या आपल्या दौºयाला नाशिकपासून सुरुवात झाली व त्यानंतर आपण राज्यभर फिरलो. या दरम्यान, मी सुरू केलेल्या निवडणूक कॅम्पेनिंगला नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांनी संपूर्ण महाराष्टत जो संदेश द्यायचा तो दिला. त्यानंतर राज्यात तरुण पिढी आपल्या पाठीशी उभी राहिल्याचे गौरवोद्गारही पवार यांनी काढले.

 

Web Title: Sharad Pawar's criticism of the rulers continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.