शरणपूररोड-गंगापूररोड : पोलिसांची विशेष नाकाबंदी मोहीम; एकही संशयित आला नाही हाती ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून एक लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:25 AM2017-12-13T01:25:45+5:302017-12-13T01:26:43+5:30

शरणपूररोड, कॉलेजरोड व गंगापूररोड परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो.

Sharanpur Road - Gangapur Road: special blockade campaign of police; There was no suspect in the 423 unauthorized driver recovering a lacquer penalty | शरणपूररोड-गंगापूररोड : पोलिसांची विशेष नाकाबंदी मोहीम; एकही संशयित आला नाही हाती ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून एक लाखाचा दंड वसूल

शरणपूररोड-गंगापूररोड : पोलिसांची विशेष नाकाबंदी मोहीम; एकही संशयित आला नाही हाती ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून एक लाखाचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देबेशिस्त वाहनचालकांचा उपद्रव४२३ वाहनचालकांवर गुन्हे तब्बल ७८ वाहने जमा

नाशिक : शरणपूररोड, कॉलेजरोड व गंगापूररोड परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष नाकाबंदी मोहीम सोमवारी (दि.११) राबविली. दरम्यान, ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून यावेळी १ लाख २३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कॉलेजरोड, शरणपूररोड, येवलेकर मळा, विसेमळा, गंगापूररोड, जेहान सर्कल आदी परिसरात सोनसाखळी चोरी, दुुचाकीचोरी, कारफोडीसारख्या वाढत्या गुन्हेगारी घटनांसोबत बेशिस्त वाहनचालकांचा उपद्रवही वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. यााबबत वारंवार पोलिस आयुक्तांकडे प्राप्त होणाºया तक्रारीनुसार पोलीस प्रशासनाने या भागात सोमवारी विशेष नाकाबंदी मोहीम आखली. या मोहिमेदरम्यान बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. सुमारे ४२३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या नाकाबंदीदरम्यान मात्र सोनसाखळी चोरट्यांसह अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले एकही संशयित पोलिसांच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे रविवारी रात्री गंगापूररोड परिसरात एका लॉन्सच्या बाहेर दोन कारच्या काच फोडून चोरट्यांनी तब्बल दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेचा छडा लावण्यासाठी मोहीम राबविल्याची चर्चा होती; मात्र नाकाबंदीच्या सापळ्यात चोरटे अडकले नाही. या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी विविध पॉइंटवरून तब्बल ७८ वाहने जमा केली. नाकाबंदी मोहिमेत वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वीमा न उतरविणे, हेल्मेट परिधान न करणे, परवाना सोबत न ठेवणे अथवा विना परवाना वाहन चालविणे, वेग मर्यादेचे पालन न करणे, सीटबेल्टचा वापर टाळणे आदी प्रकारानुसार मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

Web Title: Sharanpur Road - Gangapur Road: special blockade campaign of police; There was no suspect in the 423 unauthorized driver recovering a lacquer penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस