शरणपूररोडवर तरुणास बेदम मारहाण करून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:47 AM2018-06-19T00:47:03+5:302018-06-19T00:47:03+5:30
पादचारी युवकास रस्त्यात अडवून चौघा संशयितांनी बेदम मारहाण करून लुटल्याची घटना रविवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास कुलकर्णी गार्डन परिसरात घडली़ निखिल यादव पाटील (२३, रा. निर्जल अपा. कॅनडा कॉर्नर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे़
नाशिक : पादचारी युवकास रस्त्यात अडवून चौघा संशयितांनी बेदम मारहाण करून लुटल्याची घटना रविवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास कुलकर्णी गार्डन परिसरात घडली़ निखिल यादव पाटील (२३, रा. निर्जल अपा. कॅनडा कॉर्नर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल पाटील हा रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डनकडून कॅनडा कॉर्नरकडे पायी जात होता़ यावेळी पॅनासोनिक शोरूम शेजारील शॉपिंग सेंटरजवळ चौघा संशयितांनी त्यास अडविले़ यानंतर चौघांनी निखिल याला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाइल व दोन हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
युवकावर चाकूने हल्ला
रागाने का पाहतो, असा जाब विचारणाऱ्या युवकावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारी (दि़१६) रात्री मोठा राजवाडा परिसरात घडली़ जय विजय काळे (२३, रा. मोठा राजवाडा) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास जय काळे मोठा राजवाड्यातील डॉ. सुभाष काळे यांच्या घराच्या ओट्यावर बसलेला होता़ त्याच्याकडे संशयित आयुष साळवे याने रागाने पाहिल्याने जयने माझ्याकडे रागाने का बघतोस, अशी विचारणा केली़ याचा राग आलेल्या आयुषने साथीदार यश साळवे, रोहन रोकडे व सिद्धार्थ दोंदे यांना आवाज देऊन बोलावून घेत जयला बेदम मारहाण केली. संशयित आयुष, यश व रोहन यांनी जयला पकडून ठेवले तर सिद्धार्थ दोंदे याने चाकूने वार केले़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
त्र्यंबकेश्वरच्या युवकास मारहाण
त्र्यंबकेश्वर येथील तरुणास चौघा संशयितांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास मुंबई नाक्यावरील संदीप हॉटेलजवळ घडली़ अजय उत्तम डेगळे (रा. आंबेडकरनगर, त्र्यंबकेश्वर, नाशिक) असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अजय डगळे हा मुंबई नाक्यावरील संदीप हॉटेलजवळून मारुती व्हॅन (एमएच १५, ईबी १९४०) घेऊन जात होता़ त्यास सिग्नलजवळ मेहुणे अशोक मोरे हे भेटल्याने त्यांना संदीप हॉटेलजवळ सोडले़ यानंतर गाडी बाजूला लावून लघुशंका करून परतत असताना संशयित किरण सुभाष भामरे, भूषण चव्हाण व त्यांचे दोन साथीदार अशा चौघांनी अडवून कारण नसताना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
काठेगल्लीत महिलेचा विनयभंग
वाºयाने झाडाची फांदी अंगणात पडल्याच्या कारणातून महिलेस मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास काठेगल्लीत घडली़ या प्रकरणी संशयित विक्की श्यामसुंदर मराळकर (२८ रा. नावीन्य सोसायटी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात ला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाºयाने झाडाची फांदी संशयित मराळकर याच्या घरासमोर पडली़ मात्र, माझ्या घरासमोर फांदी का टाकली यावरून वाद घालत मराळकर यांनी महिलेस शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला तसेच जिवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातून मोबाइलची चोरी
उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून चोरट्यांनी मोबाइल चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१७) सकाळी रविवार कारंजावरील कुटु लेनमध्ये घडली़ रिमझिम वाडा येथील रहिवासी गौरव जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळच्या सुमारास कामात व्यस्त असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून टीव्हीसमोर ठेवलेला पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चॉपरचा धाक दाखवून खंडणीची मागणी
चॉपरचा धाक दाखवून तिघा संशयितांनी दुचाकीचालकाकडे पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना शनिवारी (दि़१६) जेलरोडवरील नोट प्रेसजवळ घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील गिडप्पा चाफळकर (४४, रा. पेंढारकर कॉलनी, जेलरोड) हे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात होते़ सुनील चाफळकर हे पेंढारकर कॉलनीतून जात असताना संशयित बाळा ऊर्फ विजय टिळक उदैनकर, बाळा कदम (दोघे रा. कॅनॉलरोड, जेलरोड, नाशिकरोड) व सचिन धोत्रे (रा. कस्तुरबानगर, वेद मंदिराजवळ, नाशिक) यांनी चाफळकर यांची दुचाकी अडविली. यानंतर चॉपर दाखवून त्यांच्याकडे पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे़