मालवाहतूक संपाचा फळांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:58 AM2018-07-21T00:58:33+5:302018-07-21T00:58:33+5:30
डिझेल दरवाढ मागे घ्यावी यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शुक्रवारपासून पुकारलेल्या संपाचा परिणाम नाशिक फळबाजार समितीत जाणवला. फळबाजारात शुक्रवारी केवळ ७०० क्विंटल मालाची आवक झाली.
पंचवटी : डिझेल दरवाढ मागे घ्यावी यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शुक्रवारपासून पुकारलेल्या संपाचा परिणाम नाशिक फळबाजार समितीत जाणवला. फळबाजारात शुक्रवारी केवळ ७०० क्विंटल मालाची आवक झाली. पेठरोडवरील शरदचंद्र पवार फळ बाजारात दैनंदिन जवळपास दोन हजार क्विंटल फळांची आवक होते. या फळबाजारातून संपूर्ण राज्यासह पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश राज्यात फळांची निर्यात केली जाते. साधारणपणे आठ ते दहा चारचाकी वाहने भरून हा माल पाठविला जातो. शुक्रवारपासून मालवाहतूकदारांनी संप पुकारल्याने बाजार समितीत केवळ ३० ते ३५ टक्के फळांची आवक झाली. दरम्यान, शनिवारी (२१) संपाचा परिणाम अधिक जाणविण्याची शक्यता असून, फळबाजारात कमी प्रमाणात डाळिंब माल दाखल होण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.