शिरसमणीकरांची पाण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 02:20 PM2019-05-15T14:20:28+5:302019-05-15T14:20:53+5:30

कळवण : शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्यांचे पाणी सुरु झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरु न घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे.

 Sharmasamankar's water park | शिरसमणीकरांची पाण्यासाठी धावपळ

शिरसमणीकरांची पाण्यासाठी धावपळ

Next

कळवण : शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्यांचे पाणी सुरु झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरु न घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. पाणी आपल्याला मुबलक मिळाले पाहिजे, अशी मानसिकता प्रत्येकाची झालेली आहे. त्यामुळे पाण्यासाठी असलेली धावपळ जीवावर देखील बेतते याचा अनुभव शिरसमणीकराना देखील आहे. शेजारील गावात लोकवस्त्यांवर आळी-पाळीने दररोज पाणी पुरवताना ग्रामपंचायतींना देखील कसरत करावी लागत असल्याचे चित्र असले तरी शिरसमणी गावात मात्र चित्र वेगळेच आहे ,दोन दोन दिवस पाणी पुरवठा करण्यास ग्रामपंचायतीची यंत्रणा अपयशी ठरली असून यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी नाराजी व्यक्त केली.  ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे दर दिवशी पाणी नळांना दिले पाहिजे मात्र काही भागात ते मिळते तर काही भागात तेही मिळत नाही.दोन दोन दिवस पाणी पुरवठा होत नसल्याचे नामदेव शिरसाठ यांनी सांगितले.गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली मात्र ती अपयशी ठरली ,गावात असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी आहे ,त्या विहिरींची खोली करणे गरजेचे होते त्या विहिरीला पाणी लागले असते असे ग्रामस्थांनी सांगितल. पाणीपुरवठा करण्यासाठी सहा लाख रु पये खर्च करून नवीन विहिरीचे काम केले मात्र पाणी लागले नसल्याने शासनाचा निधी वाया गेला असल्याचे सांगून ग्रामपंचायतच्या व्यवस्थेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी आशाबाई मोहिते , वैशाली शिरसाठ , जिजाबाई पाटोळे ,मंगलाबाई पाटोळे ,सोनाली मोहिते सविता मोहिते व राजेंद्र मोहिते यांनी केली आहे .

Web Title:  Sharmasamankar's water park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक