पत्नीपीडित पुरुषांनी केले मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:02 AM2019-09-23T01:02:52+5:302019-09-23T01:03:11+5:30
कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदे एकतर्फी असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या कायद्यात पुरुष हक्कांचा विचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून महिलांकडून त्या कायद्यांचा गैरवापर करणे थांबेल, अशी मागणी करत वास्तव फाउंडेशन मुंबईच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चक्क रामकुंडावर येत मुंडण केले
नाशिक : कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदे एकतर्फी असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या कायद्यात पुरुष हक्कांचा विचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून महिलांकडून त्या कायद्यांचा गैरवापर करणे थांबेल, अशी मागणी करत वास्तव फाउंडेशन मुंबईच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चक्क रामकुंडावर येत मुंडण केले अन् हवनमध्ये नात्याचे दान क रत रविवारी (दि.२२) अभिनव आंदोलनाने लक्ष वेधून घेतले.
वास्तव फाउंडेशन पुरुषांच्या न्यायहक्कांसाठी लढणारी संस्था आहे. पुरुषांवर महिलांकडून दाखल होणारे खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी या संस्थेचे पदाधिकारी प्रयत्न करतात.
समाजात महिलांवर अन्याय अत्याचार होतो ही बाब खरी जरी असली तरी पुरुषांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही.घटस्फोटाला कुठेही थारा नसून कौटुंबिक हिंसाचाराचा यासाठी आधार घेतला जातो, हे चुकीचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणतीही चूक नसताना, केवळ मनाविरु द्ध विवाह केलेल्या पत्नींकडून खोटे गुन्हे दाखल केल्याने नाहक मानसिक त्रासासह अनेकांना तुरु ंगवासही भोगावा लागला आहे. अशा शंभरपेक्षा अधिक त्रस्त पतींनी आंदोलनात सहभाग घेतला. कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. यावेळी वास्तव फाउंडेशनचे अमित देशपांडे, पुरु ष हक्क संरक्षण समितीचे अॅड. धर्मेंद्र चव्हाण उपस्थित होते.