जळगावला बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार

By admin | Published: March 26, 2017 12:31 AM2017-03-26T00:31:03+5:302017-03-26T00:31:18+5:30

निफाड : तालुक्यातील जळगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना घडली.

She killed goats in the attack of Jalgao Leopard | जळगावला बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार

जळगावला बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार

Next

निफाड : तालुक्यातील जळगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. जळगाव येथील भरत भास्कर वडघुले हे जुन्या सुंदरपूर रोडलगत राहतात. त्यांच्या घराबाहेर पत्र्याच्या शेडमध्ये त्यांच्या मालकीच्या ८ ते १० शेळ्या बांधलेल्या होत्या. शनिवारी (दि. २५) पहाटे ४ वाजेच्या सुमारास वडघुले यांच्या घरातील सदस्याला जाग आली. त्यास घराबाहेर बिबट्या आणि एक तिचे बछडे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केली. वडघुले कुटुंबीय तातडीने घराबाहेर आले व ट्रॅक्टर चालू करून त्यांनी ट्रॅक्टरचा अवाज व दिवे चालू केले. बिबट्याची मादी व एक बछडे त्यांना दिसून आहे. परंतु ट्रॅक्टरच्या आवाजामुळे बिबट्यासह बछडा शेजारी उसाच्या शेतात पसार झाला. वडघुले यांनी पत्र्याच्या शेडमध्ये पाहिले असता एक शेळी बिबट्याने ठार केलेली दिसली, तर दुसरी एक शेळी बिबट्याने नेल्याचे आढळून आले. येवला वन विभागास सदरची घटना कळवण्यात आली. येवला विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक दत्तू अहेर, भय्या शेख, विजय लोंढे आदिंच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गेल्या शुक्रवारी (दि. १७) याच बछड्याने जळगाव-काथरगाव रोडवर मोटारसायकलचा पाठलाग करून एका महिलेला जखमी केले होते. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी जळगाव येथे वनविभागाकडून पिंजारा लावण्यात आला आहे. (वार्ताहर)
नांदगाव : तालुक्यातील पोखरी जळगाव बु।। शिवारात कांद्याच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याच्या बछड्याला सायंकाळी गुंगीच्या औषधाचे इंजेक्शन मारल्यानंतर पकडण्यात आले. मन्याड नदीच्या तीरावर राठोड यांच्या शेतातील कांद्याच्या पिकात बिबट्या बसला होता. कोणाचीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. सायंकाळच्या सुमारास गुंगीच्या औधषाचे इंजेक्शन मारून त्यास बेशुध्द करण्यात आले. त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. पकडण्यात आलेला बिबट्या नर असून, ते आठ महिन्यांचे पिल्लू आहे. त्याला पकडण्यासाठी डार्टतज्ज्ञ शरद थोरात, अशोक काळे यांचे पथक बोलावण्यात आले होते. सकाळच्या सुमारास बिबट्याची खबर मिळाली तेव्हा तालुका वनाधिकारी विक्रम अहिरे नाशिक येथे बैठकीसाठी गेले होते. ते आल्यानंतर बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेला गती मिळाली.

Web Title: She killed goats in the attack of Jalgao Leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.