मेंढी शिवारात उपासमारीने बछड्याचा मृत्यू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:46 AM2019-07-12T00:46:03+5:302019-07-12T00:47:27+5:30
सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात सोमठाणे रस्त्यावर बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. सुमारे चार महिने वयाच्या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सिन्नर : तालुक्यातील मेंढी शिवारात सोमठाणे रस्त्यावर बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. सुमारे चार महिने वयाच्या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नांदूरमधमेश्वर उजवा कालव्याच्या मोरीत क्लच वायरचा फास पोटाभोवती आवळल्याने अवयव कापले जाऊन एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला होता. तेथून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर मृत बछडा आढळून आला. त्या मादीचाच हा बछडा असण्याची शक्यता आहे. कसारी नाला परिसरात घडलेल्या या घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
वनविभागाचे वनपाल अनिल साळवे, शरद थोरात, मधुकर शिंदे, रोहित लोणारे, नारायण वैद्य यांनी घटनास्थळी जाऊन मृत बछडा ताब्यात घेतला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. हळकुंठे
यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मोहदरी वनउद्यानात अग्निडाग
दिला.