मेंढ्यांना खाव्या लागतात मोकळ्या माळरानावरील वाळलेल्या गवताच्या काड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:28 AM2018-12-01T01:28:26+5:302018-12-01T01:29:06+5:30

जिल्ह्यातील बºयाच भागांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत आहे. यावर्षी पडलेल्या कमी पावसाने सर्वत्र पाणीटंचाईचे सावट निर्माण केले आहे. त्यामुळे खरिपाचा हंगामही वाया गेला. जनावरांसाठी चाराही नाही. अपुºया पावसामुळे पिकांची वाढच झाली नसल्याने अपुºया वाढलेल्या ज्वारी, बाजरीसारख्या पिकांची बाटुक किती दिवस पुरणार, असा प्रश्न आता पशुपालकांसमोर उभा आहे.

The sheep are eaten by slices of grass | मेंढ्यांना खाव्या लागतात मोकळ्या माळरानावरील वाळलेल्या गवताच्या काड्या

मेंढ्यांना खाव्या लागतात मोकळ्या माळरानावरील वाळलेल्या गवताच्या काड्या

Next

खेडलेझुंगे : जिल्ह्यातील बºयाच भागांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत आहे. यावर्षी पडलेल्या कमी पावसाने सर्वत्र पाणीटंचाईचे सावट निर्माण केले आहे. त्यामुळे खरिपाचा हंगामही वाया गेला. जनावरांसाठी चाराही नाही. अपुºया पावसामुळे पिकांची वाढच झाली नसल्याने अपुºया वाढलेल्या ज्वारी, बाजरीसारख्या पिकांची बाटुक किती दिवस पुरणार, असा प्रश्न आता पशुपालकांसमोर उभा आहे.
देवळा, नांदगाव तालुक्यातील शेकडो मेंढपाळ खेडलेझुंगे, सारोळेथडी, धारणगाव वीर, खडक, रु ई परिसरामध्ये आले आहेत. गावाकडे जनावरांना चारा, पाणी उपलब्ध नाही त्यामुळे या परिसरात स्थलांतरित झाल्याचे दिसून आले. पावसाच्या सुरुवातीपासून पुढील ४-५ महिने गावीच शेती करून उदरनिर्वाह करीत असलेल्या कुटुंबावर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. इकडे येऊनही जनावरांना हिरवा चारा कुठे मिळत नाही. शेतकरी त्यांच्या शेतात जनावरांना येऊ देत नाहीत. कारण त्यांच्याकडे उपलब्ध चारा जनावरांसाठी राखून ठेवलेला आहे. त्यामुळे मिळेल त्या माळरानावर शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी सोडले जाते.
ऊस व चाºयाची अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करावी लागत आहे. त्यात वाहतूक खर्चही सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे रोजचा शंभर ते दीडशे रुपये एका जनावराला खर्च करणे सामान्य पशुपालकाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परिसरातील शेळ्या-मेंढ्यापालकही मेटाकुटीला आले आहेत. पावसाअभावी दिवसेंदिवस माळरानही ओसाड, भकास दिसत आहेत. गवताच्या वाळून गेलेल्या काड्या आणि बाभळीच्या काट्यांतून पाला कुरतडत माळावर जनावरे चाºयासाठी फिरत आहेत. उन्हाच्या झळा बसू लागल्याने या भागात पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे. उन्हाळ्यात येणाºया भयाण परिस्थितीला तोंड देण्याऐवजी आताच जनावरे विकली, तर किमान ती शेतकºयांच्या दावणीला तरी जातील. या भाबड्या समजुतीने पशुपालक जनावरांना मिळेल त्या किमतीला बाजारात विकत आहेत. चारा नसल्याने ज्या शेतकºयांकडे तीन-चार जनावरे होती तेथे आता एखादेच जनावर दिसत आहे.  सगळ्याच प्रश्नाकडे तटस्थपणे बघणाºया प्रशासनाने पिण्याच्या पाण्यापाठोपाठ आता जनावरांना मुबलक चारा उपलब्ध असल्याच्या दावा आपल्या अहवालात दिल्याने आता जणू दुष्काळाची स्थिती नाही अशा थाटात नामानिराळे होण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने चारा-पाण्याची मागणी घेऊन आलेल्या गरजू शेतकºयांना हताश होण्याची वेळ आली आहे. प्रशासन दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी सब कुछ आलबेल असल्याची बतावणी करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. एरवी कागदी घोडे नाचविणारे प्रशासन पाणी चाºयाच्या मुद्द्यावरदेखील संवेदनशील नसल्याचे निदर्शनास आले आहे. 
दुष्काळाची भीषण दाहकता समोर असताना केवळ सोपस्काराच्या भूमिकेत वावरताना धन्यता मानताना दिसत आहे.
चारा आणि पाणीटंचाईने तोंड वर काढल्याने तालुक्यातील शेळ्या-मेंढ्यांसह लहान-मोठ्या जनावरांचे हाल सुरू आहेत. पशुधन जगविण्यासाठी शेतकरी कष्ट घेत असला तरी मेंढपाळांसह पशुपालकांना चारा आणि पाण्याची सोय करताना नाकीनव आले आहे. त्यामुळे देवळा, नांदगाव व इतर दुष्काळग्रस्त तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. तालुक्यातील चाºयाचे सर्व स्रोत संपले असून, अपवाद वगळता सर्वत्र विकतचा चारा घेऊनच जनावरे वाचविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरातून चारा छावण्या लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कृषी विभागाचे दुर्लक्ष
चाराटंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा किंवा तालुका स्तरावरील कृषी विभागाने कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. चारा निर्मितीसाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. अवकाळी पावसामुळे बºयाच पिकांचे नुकसान झालेले असून, रब्बी हंगामात निर्माण होणारा चारा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येते. कृषी विभागाने विभागनिहाय शेतकºयांशी संवाद साधून, चर्चासत्रे आयोजित करून उन्हाळी चारा पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करणे क्र मप्राप्त होते. शेतकºयांना चारा पिकाचे बियाणे मोफत देणे गरजेचे होते. अवकाळी पावसामुळे परिसरातील रब्बी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याने गहू व ज्वारी पीक सडल्याने चारा उत्पादनात घट होणार आहे. 
कृषी विभागाचे चारा उत्पादनाकडे दुर्लक्ष
चाराटंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा किंवा तालुका स्तरावरील कृषी विभागाने कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. चारा निर्मितीसाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. अवकाळी पावसामुळे बºयाच पिकांचे नुकसान झालेले असून, रब्बी हंगामात निर्माण होणाºया चारा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येते. कृषी विभागाने विभागनिहाय शेतकºयांशी संवाद साधून, चर्चासत्रे आयोजित करून उन्हाळी चारा पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करणे क्र मप्राप्त होते. शेतकºयांना चारा पिकाचे बियाणे मोफत देणे गरजेचे होते. अवकाळी पावसामुळे परिसरातील रब्बी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याने गहू व ज्वारी पीक सडल्याने चारा उत्पादनात घट होणार आहे.

Web Title: The sheep are eaten by slices of grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.