कवडीमोल भावामुळे शेतकऱ्याने मेथीच्या शेतात सोडल्या मेंढया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:33 PM2019-02-02T14:33:35+5:302019-02-02T14:34:03+5:30

पाटोदा : कवडीमोल भाव मिळत असल्याने केलेला खर्चही निघत नसल्याने पाटोदा येथील शेतकरी दौलत बोरनारे यांनी अर्धा एकरवरील मेथीच्या भाजीच्या शेतात शेळ्या-मेंढया सोडून संताप व्यक्त केला.

 The sheep left in the fenugreek field due to kavidimol brother | कवडीमोल भावामुळे शेतकऱ्याने मेथीच्या शेतात सोडल्या मेंढया

कवडीमोल भावामुळे शेतकऱ्याने मेथीच्या शेतात सोडल्या मेंढया

googlenewsNext

पाटोदा : कवडीमोल भाव मिळत असल्याने केलेला खर्चही निघत नसल्याने पाटोदा येथील शेतकरी दौलत बोरनारे यांनी अर्धा एकरवरील मेथीच्या भाजीच्या शेतात शेळ्या-मेंढया सोडून संताप व्यक्त केला. यावर्षी अत्यल्प पाणी असतांनाही प्रतिकूल परिस्थितीत भाजीपाला पिके घेतली. त्यासाठी सुमारे सात ते नऊ हजारापर्यंत खर्च केला. येवला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही भाजीपाला व इतर पिकांना भाव मिळेल आशेवर परिसरातील शेतकºयांनी उपलब्ध पाण्यावर आपल्या शेतात भाजीवर्गीय पिके घेतली मात्र त्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतात टाकलेल्या मेथीच्या भाजीस लासलगाव, मनमाड, नाशिक येथील बाजारात शेकडा दोनशे अडीचशे भाव मिळत मिळत आहे.मेथीची तयार भाजी शेतातून मजुरांकरवी काढण्यासाठी सरासरी शेकडा दोनशे रु पये मजुरी द्यावी लागत आहे.तसेच वाहतूक खर्च सुमारे अंतरानुसार एक हजार ते दोन अडीच हजार रु पये खर्च येत असल्याने व अडत हमाली यासारखा खर्च येतो मात्र भाव मिळत नसल्याने शेतकºयांना पदरमोड करून घरून मजुरांचे पैसे दयावे लागत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

Web Title:  The sheep left in the fenugreek field due to kavidimol brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक