कांदा रोपाच्या शेतात सोडल्या मेंढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:15 PM2018-12-19T15:15:15+5:302018-12-19T15:15:33+5:30
ब्राह्मणगाव : उन्हाळी कांदा भाववाढीच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात शिल्लक असून त्यातच लाल कांद्यालाही भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या रोपांच्या शेतात मेंढ्या चारण्यास सोडून देत आपला संताप व्यक्त केला.
ब्राह्मणगाव : उन्हाळी कांदा भाववाढीच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात शिल्लक असून त्यातच लाल कांद्यालाही भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या रोपांच्या शेतात मेंढ्या चारण्यास सोडून देत आपला संताप व्यक्त केला.
कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकºयांनी आठ ते दहा महिने कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला. एवढा कांदा साठवूनही त्यास अत्यल्प भाव मिळत असल्याने हा कांदा आता अजून किती दिवस साठवून ठेवावा या विवंचनेत शेतकरी असून त्यातच लाल कांद्याची आवक वाढल्याने व पुन्हा भाव खूपच कमी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याचा लागवडीचा खर्च ही निघत नाही, कांद्यालाच काय पण शेती पिकांमध्ये कुठल्याच पिकाला भाव नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे. येथील कांदा उत्पादक भाऊसाहेब हिरे यांनी आपल्या शेतातील कांदा रोपांच्या शेतात मेंढ्यांना चारायला सोडत संताप व्यक्त केला आहे. कांदा हे शेतकºयांचे नगदी पीक आहे. त्यात दोन पैसे भेटले तर शेतकरी मुलांचे लग्न, शिक्षण , दवाखाना, वीज बिल , शेती कर्ज देऊ शकेल, मात्र कांद्याला व अन्य पिकांना भावच नसल्याने त्यातच पुन्ह पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाने घेरले आहे. शेतीला पाणी, जनावरांना चारा , कुटुंबाला आर्थिक आधार या सर्व संकटांवर कशी मात करावी कांदा उत्पादकांनी पंतप्रधान कार्यालयाला कांदा विक्र ीची रक्कम मनी आॅर्डर करूनही काहीच दखल केंद्र किंवा राज्य सरकार घेत नसल्याने शेतकºयांनी आता संताप व्यक्त करत कांदा पिकात व कांदा रोपांचे शेतात जनावरे चरण्यासाठी सोडून दिली आहेत.