सटाणा उपनगराध्यक्षपदी शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:34 AM2019-09-18T01:34:28+5:302019-09-18T01:35:08+5:30
सटाणा येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे मुन्ना कासम शेख यांची बिनविरोध निवड झाली.
सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे मुन्ना कासम शेख यांची बिनविरोध निवड झाली. मंगळवारी (दि.१७) रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत शेख यांची निवड करण्यात आली.
उपनगराध्यक्ष महेश देवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या या पदाच्या निवडीसाठी मंगळवारी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली. नगराध्यक्ष सुनील मोरे, मुख्य अधिकारी हेमलता डगळे यांच्यासह सर्व नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित होते. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दिलेल्या मुदतीत भाजपचे मुन्ना शेख यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून महेश देवरे यांची, तर अनुमोदक म्हणून राकेश खैरनार यांची स्वाक्षरी होती. दुसरा अर्ज न आल्याने तहसीलदार इंगळे यांनी मुन्ना शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
निवडीनंतर शेख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अधिकारी हेमलता डगळे, सभापती दिनकर सोनवणे, दीपक पाकळे, नितीन सोनवणे, राहुल पाटील, राकेश खैरनार, मनोहर देवरे,नगरसेवक निर्मला भदाणे, पुष्पा सूर्यवंशी, सुनीता मोरकर, संगीता देवरे, सुवर्णा नंदाळे, भारती सूर्यवंशी, शमा आरिफ मन्सुरी, डॉ. विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव, सोनाली बैताडे यांच्यासह माजी नगरसेवक मनोज सोनवणे, श्रीपाद कायस्थ, रवींद्र खैरनार, सागर अहिरे, रवि सोनवणे आदी उपस्थित होते.