नाशिक प्रादेशिक वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षकपदी शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:35 PM2018-08-14T22:35:38+5:302018-08-14T22:40:07+5:30

 Shelke for Nashik Regional Forest Department's Chief Conservator of Forests | नाशिक प्रादेशिक वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षकपदी शेळके

नाशिक प्रादेशिक वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षकपदी शेळके

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिकच्या कार्यआयोजना विभागातील उपवनसंरक्षकपदी जी.मल्लिकार्जुन नाशिक विभागीय वनधिकारी व्ही.टी.घुले यांची शहापूर उपवनसंरक्षकपदी नियुक्ती

नाशिक : नाशिक प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव यांची चंद्रपूर प्रादेशिकच्या मुख्य वनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदी चंद्रपूरचे व्ही.एस.शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक वनविभागातील विभागीय वनधिकारी (दक्षता) व्ही.टी.घुले यांची शहापूर येथील उपवनसंरक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील उपवनसंरक्षक जी.मल्लिकार्जुन यांची नाशिकच्या कार्यआयोजना विभागातील उपवनसंरक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाच्या वतीने भारतीय वनसेवा व राज्य वनसेवेतील एकूण २८ वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेश महसूल व वनमंत्रालयाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षकचा समावेश आहे.यात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.एन. त्रिपाठी (कार्य आयोजना, पुणे), मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी (एपीसीसीएफ, मुंबई), लोकसेवा आयोग सचिव प्रदीप कुमार (वनविकास, नागपूर), मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुडा (एपीसीसीएफ, नागपूर), मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव (चंद्रपूर, प्रादेशिक), मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. शेळके (नाशिक, प्रादेशिक), मुख्य वनसंरक्षक मुकुल त्रिवेदी (नागपूर, वनविनियम), मीरा अय्यर (मानव संसाधन विकास, नागपूर), वनसंरक्षक एन. आर. प्रवीण (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), उपवनसंरक्षक जी. पी. नरवणे (मध्य चांदा, प्रादेशिक), गजेंद्र हिरे (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), भरतसिंह हाडा (सातारा, प्रादेशिक), ए. एम. अंजनकर (नाशिक, वन्यजीव), एच. जी. धुमाळ (कोल्हापूर, प्रादेशिक), प्रभुदास शुक्ला (नागपूर, प्रादेशिक), जी. मल्लिकार्जुन (नाशिक कार्य आयोजना), पी.टी. मोरणकर (यावल, प्रादेशिक), एस. एस. दहीवले (अमरावती कार्य आयोजना), एन.ए.विवरेकर (वडसा, प्रादेशिक), व्ही.एम. गोडबोले (नागपूर भूमिअभिलेख), व्ही. एन. हिंगे (बल्लारशाह), सी. एल. धुमाळ (कुंडल, विकास प्रबोधिनी), व्ही. बी. जावळेकर (अमरावती, प्रादेशिक), व्ही.जे. भिसे (डहाणू, प्रादेशिक), एन.एस. लडकर (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), किशोर मानकर (नागपूर संसाधन उपयोग), व्ही. टी. घुले (शहापूर, प्रादेशिक), डी. पी. निकम (औरंगाबाद कार्य आयोजना) यांचा समावेश आहे.

Web Title:  Shelke for Nashik Regional Forest Department's Chief Conservator of Forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.