मेंढपाळांचा पाडवा सण वाड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:01 PM2020-03-25T23:01:52+5:302020-03-25T23:02:46+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या. परंतु पोटासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांनी मात्र आपल्या वाड्यावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले.

Shepherd's Feast | मेंढपाळांचा पाडवा सण वाड्यावरच

मेंढपाळांचा पाडवा सण वाड्यावरच

Next

खामखेडा : नववर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या. परंतु पोटासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांनी मात्र आपल्या वाड्यावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. पोटासाठी भटकंती करणारे धनगर सामाजाचे वल्लर लोक हे मेंढपाळ व्यवसाय करतात. मेंढपाळ दीपावलीचा दिवा उतरविल्या नंतर मेंढ्या चरण्यासाठी काढतात. बागलाण तालुक्यातील देवळाने, ढोलबारे, अमरावती पाडा, कोटबेल, मोहपाडे, करजगव्हण, मालेगाव तालुक्यातील हाताने, टिपू आदी भागातील मेंढपाळांचे वाडे दाखल झाले आहेत. या मेंढपाळांनी आपल्या वाड्यावरच सण साजरा केला.

Web Title: Shepherd's Feast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.