दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शेवाळे, वडजे कार्याध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:25 PM2020-08-12T20:25:43+5:302020-08-13T00:13:41+5:30
दिंडोरी : दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य बी. के. शेवाळे, कार्याध्यक्षपदी आर. सी. वडजे तर कार्यवाहपदी जे. डी. जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती समन्वयक के. के. आहिरे यांनी दिली. शेवाळे हे दुसऱ्या मुख्याध्यापक संघात होते, त्यांना या संघात आणून अध्यक्षपदाची संधी दिली आहे.

दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी निवड बैठक नुकतीच दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये संपन्न झाली. या तिघांची निवड झाल्याबद्दल नासिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे वतीने सत्कार करण्यात आला.
उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष-भरत डोखळे, जे. एस. थवील, श्रीमती के. पी. गांगुर्डे, डी. व्ही. खर्चे, सहकार्यवाह अरु ण भारमल, मधुकर आहेर,समन्वयक केल्हे डी एस,जिल्हा प्रतिनिधी विजय म्हस्के, आर टी जाधव, कोषाध्यक्ष महेंद्र ठाकरे, सहकोषाध्यक्ष डी जी शिंदे, अंतर्गत हिशोब तपासनीस आर. डी. कलसाईत, महिला प्रतिनिधी श्रीमती संध्या साखरे, श्रीमती एस. एस. खैरनार, मार्गदर्शक बी. जी. पाटील, डी. बी. चंदन, प्रवक्ता पी. डी. जोपळे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून ए. पी. जगताप, पी. टी. गुंजाळ , केवळ देवरे, पी. एन. पाटील, डी. वाय. पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी जिल्हास्तरावर गुणवंत मुख्याध्यापक म्हणून ए.डी. काळे व गुणवंत शिक्षक डी. जी. वाणी यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाब भामरे, कार्यवाह आर. डी. निकम, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, समन्वयक के. के. अहिरे मार्गदर्शक सी. बी. पवार, व्ही. के. मोहिते,भगूरचे नगरसेवक संग्राम करंजकर, जयेश सावंत, सुनील भामरे, एम. टी. घोडके, सुरेंद्र बच्छाव, आशिष पवार, पी. एन. पाटील, गुलाब भुसाळ, एम. व्ही. बोराडे आदी उपस्थित होत.े