शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:24+5:302021-08-12T04:18:24+5:30
नाशिक जिल्हा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व विनाअनुदानित शिक्षक भारती संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व घोषित ...
नाशिक जिल्हा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व विनाअनुदानित शिक्षक भारती संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व घोषित व अघोषित विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांवरील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन सुरू करावे, शहरी भाग २५, ग्रामीण भाग २०, डोंगराळ भाग १५ विद्यार्थी तुकडीचा निकष कायम ठेवावा. कला, क्रीडा व आयसीटी शिक्षकांचा संचमान्यतेत समावेश करावा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी देय ठरलेल्या वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी आवश्यक असणारे ऑनलाइन प्रशिक्षण तत्काळ देण्यात यावे. सावित्री फातिमा शिक्षक कुटुंब स्वास्थ्य योजना त्वरित लागू करावी. शालार्थ आयडी देणारी संगणक प्रणाली त्वरित रद्द करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात के. के. आहिरे, भरत शेलार, राजेंद्र लोंढे, साहेबराव कुटे, विनायक लाड, संजय देवरे, जयवंत भाबड, प्रकल्प पाटील, कांतीलाल जाधव, परशराम शेळके आदी सहभागी झाले होते. (फोटो १० शिक्षक)