शिमला मिरची, गिलके जनावरांच्या पुढ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:31 PM2020-04-03T22:31:28+5:302020-04-03T22:31:44+5:30

भाजीपाल्याचा लिलाव कमी तसेच सगळीकडे मार्केटही बंद असल्याने शेतमाल मातीमोल दराात विकण्यापेक्षा अडीच एकर शेतातील काढणीस आलेले गिलके व शिमला मिरची थेट जनावरांना खाऊ घातल्याचा प्रकार नाशिक तालुक्यातील नागलवाडी येथे घडला.

Shimla peppers, Gilke in front of animals! | शिमला मिरची, गिलके जनावरांच्या पुढ्यात !

शिमला मिरची, गिलके जनावरांच्या पुढ्यात !

Next
ठळक मुद्देनागलवाडी : उत्पादन खर्च निघत नसल्याने नैराश्य

नाशिक : भाजीपाल्याचा लिलाव कमी तसेच सगळीकडे मार्केटही बंद असल्याने शेतमाल मातीमोल दराात विकण्यापेक्षा अडीच एकर शेतातील काढणीस आलेले गिलके व शिमला मिरची थेट जनावरांना खाऊ घातल्याचा प्रकार नाशिक तालुक्यातील नागलवाडी येथे घडला.
कोरोनाचे नवे संकट समोर उभे ठाकल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्ग देखील अडचणीत सापडला आहे. संचारबंदी व लॉकडाउनचा फटका त्यांनाही सोसावा लागत आहे. नागलवाडी येथील तरुण शेतकरी राहुल वसंत भोर व सागर वसंत भोर यांनी जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात बागायती क्षेत्र अधिक असल्याने द्राक्ष, भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. यंदाही हवामान अनुकूल व भरपूर पाणी असल्याने उन्हाळी बागायती पिके जोमात आहेत. मात्र द्राक्षांसोबत भाजीपाला विकायचा कुठे? ग्राहक नाही, व्यापारी माल घेत नाहीत,परप्रांतातील व्यापारी प्रांतात निघून गेले तसेच बाजार समितीत मातीमोल बाजारभाव असल्याने भाजीपाला विकायचा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत सागर व राहुल या भावंडांनी शेतातील गिलके, लाखोंचे खर्च करून उभारलेल्या शेडनेटमधील शिमला मिरचीचे खुडलेले पीक क्रेटमध्ये भरून थेट गावात मोफत दिले, तर काही शेतातील जनावरांना खायला दिले. रोज ४५ क्रेट गिलके जनावरांना घालण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नव्हता.
दोन लाख रुपये खर्च करून गिलक्याची बाग उभी केली तसेच शिमला मिरचीच्या बागेसाठी एकरी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. बाजारभाव चांगला मिळेल या आशेने बागेची व पिकांची काळजी घेतली. पीक हातात आले असतानाच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी घोषित झाली. त्यामुळे लिलावांवर परिणाम झाला आणि सगळीकडे मार्केटही बंद झाल्या. त्यामुळे मातीमोल भावात शेतमाल विकण्यापेक्षा पहिल्या खुडणीचे गिलके आणि शिमला मिरची जनावरांना खाऊ घातली. तसेच त्यातील काही नागरिकांना मोफत वाटले. कोरोनाच्या संकटात सामान्य लोकांची उपासमार होत असताना, लॉकडाउनमुळे मजूर मिळत नाही. भाजीपाला मातीमोल विकला जात आहे. शेतमालाची मागणीही रोडावली आहे. त्यात कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Web Title: Shimla peppers, Gilke in front of animals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.