आरोग्य विद्यापीठातर्फे शिनगारे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:18 AM2019-02-26T01:18:28+5:302019-02-26T01:18:46+5:30
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचा महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर शिनगारे यांची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिली आहेच शिवाय त्यांनी विद्यापीठासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची आठवण यावेळी अनेकांनी सांगितली.
नाशिक : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचा महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर शिनगारे यांची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिली आहेच शिवाय त्यांनी विद्यापीठासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची आठवण यावेळी अनेकांनी सांगितली.
विद्यापीठाच्या सभागृहात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते शिनगारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. राजेश गोंधळेकर, राजश्री नाईक, डॉ. श्रीराम सावरीकर, डॉ. अजय वंदनवाले, डॉ. अजित गोपछडे, डॉ. जे. जे. पवार, डॉ. मनीषा कोठेकर, डॉ. जयंत पळसकर, डॉ. धनाजी बागल, एन. व्ही. कळसकर, डॉ. संदीप गुंडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रति-कुलगुरू मोहन खामगावकर यांनी कार्यालयीन कामकाजात नियमांचे काटेकोर पालन करून प्रश्न सोडविण्यात डॉ. शिनगारे कुशल असल्याचे म्हटले. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. श्रीराम सावरीकर यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्तकेले.
सत्काराला उत्तर देताना शिनगारे यांनी विद्यापीठाशी आपले कौटुंबिक संबंध असल्याचे म्हटले. विद्यापीठात काम करताना बरेच अनुभव आले. हाच आनंद प्रेरणादायी होता, असे ते म्हणाले.
याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, संजय नेरकर, यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. आभार ए. व्ही. कळसकर यांनी मानले.
प्रश्न सोडविण्यास केली मोठी मदत
कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले, विद्यापीठाच्या स्थापनेपासून डॉ. प्रवीण शिनगारे यांचा विविध कामकाजात मोलाचा वाटा राहिला आहे. विद्यापीठाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महत्त्वाचे सल्ले देण्याबरोबरच मदतदेखील केली आहे.