शिंदे यांच्या बैलजोडीला यंदा मिळाला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:32+5:302021-09-08T04:19:32+5:30
जळगाव नेऊर : परिसरात बैलपोळ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज असला, तरी जुन्या रूढी, परंपरेने चालत आलेल्या ...
जळगाव नेऊर : परिसरात बैलपोळ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज असला, तरी जुन्या रूढी, परंपरेने चालत आलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे ग्रामीण भागात अजूनही बैलपोळ्याला मानाची परंपरा कायम असून, हा मान यंदा राजेंद्र शिंदे यांच्या बैलजोडीला मिळला आहे.
जळगाव नेऊर येथे कित्येक दशकापासून बैलपोळ्याला मान दिला जातो, या वर्षी बैलपोळ्याचे मानकरी सोसायटी अध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ शिंदे यांना मिळाला, मानकरी कुटुंब नवरात्र उत्सवात देवीचा मान ठेऊन होम हवनाचा खर्च करतात. या वर्षी पोळा सणावर कोरोनाचे सावट होते.
शेतकऱ्यांनी पोळ्याच्या दिवशी बैलाकडून कोणत्याही प्रकारचे काम करून न घेता, त्याला दिवसभर यथेच्छ चारा, वैरण देऊन त्याला अंघोळ घालून छानपैकी सजविण्यात आले होते. रंग, गोंडे, फुगे, विविध प्रकारचे घुंगरू, कासरा, झाल आदींनी त्याला सजविण्यात आले होते. त्यानंतर, गावातील वेशीत त्यांची मिरवणूक काढण्यात आली व गुरूंच्या मंगलाष्टकाने, विधिवत पूजा झाली, गावातील सर्व शेतकऱ्यांचे बैल आल्यावर मानाच्या बैलजोडी व शेतकऱ्यांचे नाव जाहीर करण्यात आले.
यावेळी मानकरी ठरलेल्या शेतकरी राजेंद्र शिंदे यांच्या बैलजोडीला मान देऊन वेशीतून बैलपोळा सोडण्यात आला, त्यामुळे येथील पोळा बघण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गर्दी झाली होती.
बैलांच्या सजावटीच्या साहित्याच्या दरात या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने व उत्पन्नाअभावी शेतकऱ्यांनी पोळा साध्या वातावरणातच साजरा केल्याचे दिसून आले. कांदा, टोमॅटो व इतर पिकांना अत्यल्प भाव मिळत असल्याने, शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्याने, याचा प्रातिनिधिक निषेध म्हणून शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर शेतीमालाला हमी भाव द्या, अशा अनेक प्रकारचे संदेश लिहून शासनाचा निषेध केला असल्याचे दिसत होते.
(०७जळगाव नेऊर)
येथील राजेंद्र शिंदे यांच्या मानाची बैलजोडीला प्रथम वेशीतून काढताना, विकास गायकवाड, शांताराम शिंदे, मच्छिंद्र शिंदे, प्रवीण शिंदे आदी.
070921\07nsk_38_07092021_13.jpg
येथील राजेंद्र शिंदे यांच्या मानाची बैलजोडीला प्रथम वेशीतुन काढताना विकास गायकवाड, शांताराम शिंदे मच्छिंद्र शिंदे, प्रवीण शिंदे आदी.