शिंदे येथील टोलवसुली अन्यायकारक वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:04 AM2017-12-16T01:04:01+5:302017-12-16T01:04:42+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलवसुली अन्यायकारक आहे. टोलवसुली करताना हलके, मध्यम व अवजड असे वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी, अशी मागणी शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलवसुली अन्यायकारक आहे. टोलवसुली करताना हलके, मध्यम व अवजड असे वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी, अशी मागणी शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
प्रकल्प संचालक सुनील भोसले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरणातील काही काम अपूर्ण असतानाही टोलवसुली केली जात आहे. मात्र टोलवसुली करताना शासन मान्यतेनुसार हलके, मध्यम व अवजड वाहन असे योग्य ते वर्गीकरण करण्यात आलेले नाही. टोलवेज कंपनीकडून हलके व अवजड वाहन असेच वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे मध्यम वजनाच्या वाहनांकडूनदेखील अवजड वाहनांच्या दराप्रमाणे टोलवसुली करून आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. महामार्गालगतच्या गावामध्ये पिकअप शेड, पथदीपांची व्यवस्था नाही. प्रवासी व वाहनाचालकांसाठी शौचालय, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. टोलनाक्यावर क्रेन-रुग्णवाहिका या उपलब्ध नाही. नाशिक, सिन्नर या औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाºया-येणाºया बसेस व इतर वाहनांना योग्य ती सवलत देऊन पास द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश उपसचिव संजय गायकर, जिल्हाअध्यक्ष लक्ष्मण पाटील, दीपक ताकाटे, किशोर निकम, विश्वास लांबे, मनोज उदांवत, पकंज बिर्ला, शंकर वारुंगसे, पिंटू शिंदे, प्रशातं शिरोडे, अविनाश भुसे, गणेश मैड, चव्हाण आदींच्या सह्या आहेत.