शिंदवडला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:20 PM2020-10-01T23:20:12+5:302020-10-02T01:06:03+5:30
दिंडोरी : तालुक्यातील शिंदवड येथे गुरूवारी (दि.१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दिंडोरी : तालुक्यातील शिंदवड येथे गुरूवारी (दि.१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पावसामुळे काही क्षणातच गावातील नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाली. शिंदवड येथील फरशीवरु न पाणी वाहु लागल्याने वडनेर भैरव, खेडगाव,तिसगाव,बहादुरी आदि गावांचा संपर्क तुटला होता. या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले असुन हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे. काढणीस आलेली सोयाबीन पाण्याखाली गेली आहेत. द्राक्ष छाटणीचा हंगाम असुन पोंगा अवस्थेत असलेल्या बागा धोक्यात आल्या आहेत. टमाटा पिकही पावसाने खराब झाले आहे. त्यामुळे टोमँटो पिके देखील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.