खामखेडा नजिकच्या शिपल्या डोंगराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 09:51 PM2021-03-30T21:51:14+5:302021-03-31T01:04:58+5:30
खामखेडा : येथील बुटबारे परिसरातील शिपल्या डोंगरास अचानक आग लागली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. त्यामुळे या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
खामखेडा : येथील बुटबारे परिसरातील शिपल्या डोंगरास अचानक आग लागली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. त्यामुळे या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
खामखेडा गावाच्या उत्तरेस असलेल्या मांगबारी घाट ते डांगसौंदाणे घाट अशी १३ ते १५ किलोमीटर संलग्न सह्यांद्रीच्या सलग डोंगररांगा पिळ्कोस, खामखेडा, विसापूर, बिजोरे, भादवण, चाचेर, पांढरीपाडा, धनगरपाडा, रंगापूर या गावांना लाभल्या आहेत. या डोंगर रांगेवर पाण्याचे स्रोत, दाट झाडी असल्यामुळे या डोंगर रांगेत बिबट्या तसेच वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बागलाण तालुक्याच्या हद्दीतील तिळवण किल्ला व किल्ल्याच्या परिसरातील डोंगराला आग लागली. ही आग हळु हळु पसरत देवळा वनपरिक्षेत्र हद्दीतील खामखेडा येथील फांगदर शिवारातील बूटबारे परिसराच्या शिपल्या डोंगराच्या परिसरातील वनकक्ष क्रमांक २४६ च्या आग क्षेत्रात लागली.
ही आग रौद्ररूप धारण करत असतानाच या आगीचे वृत्त ग्रामस्थांनी देवळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनविभाग व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत आग विझवून डोंगरावर वास्तव्य करणाऱ्या असंख्य प्राणी, पक्षी व जीव-जंतूंचे प्राण वाचवले.
नाशिक दक्षता विभागाचे स्वप्निल घुरे, देवळा वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी माजी सरपंच संजय मोरे वन समितीचे अध्यक्ष दिपक मोरे, संजय शेवाळे, रवींद्र शेवाळे, संजय शेवाळे, श्रावण शेवाळे, दीपक शेवाळे, फांगदर वस्तीचे आदिवासी बांधव तसेच वनपाल पी. पी. सोमवंशी, डी. पी. गवळी, वनरक्षक शांताराम आहेर, टि. एम. भामरे व ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.