इगतपुरीतील मानाच्या साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 04:45 PM2019-12-20T16:45:05+5:302019-12-20T16:45:25+5:30
मिरवणूक : समाजप्रबोधनपर जनजागृती
इगतपुरी : शहराची मानाची पालखी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री साई सहाय्य समितीच्या साई पालखीचे इगतपुरीतुन शिर्डीकडे प्रस्थान झाले खालचीपेठ येथील महादेव मंदिरात सकाळी आठ वाजता पालखीची पूजा व महाआरती एसएमबीटीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रदीप नाईक, साई समितीचे अध्यक्ष राजेश देवळेकर , प्रभुनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवानी, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ, जि. प. सदस्य कावजी ठाकरे, डॉ. सचिन मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साई पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन अजित लुणावत, पत्रकार संघाचे अध्यक्ष पोपट गवांदे, महेश शिरोळे, अजित पारख, बाळासाहेब धुमाळ, नगरसेविका आरती कर्पे, मीना खातळे, रोशनी परदेशी, नगरसेवक उमेश कस्तुरे, संपत डावखर, योगेश चांडक, कीशोर बगाड, माजी नगरसेवक यशवंत दळवी, सतिष करपे, डॉ. मंगेश वाघ, मनोहर गायकवाड, विजय गडाळे, रामानंद बर्वे, विरेंद्र गोठी, , रोहिदास शिर्के, रु पेश जाधव, व्यंकटनाना भागडे, मुन्नाशेठ शिंगाडे, सीताराम सहाणे, आदी उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजर, लेझीम पथक तसेच वारकऱ्यांचा टाळ-मृदंगाचा गजर, आदिवासी नृत्य, रथामध्ये साई बाबाच्या वेशभूषा साकारलेले मुले, अश्वारोहण यामुळे मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले होते. मिरवणुकीत साईनामाचा जयघोष करतानाच बेटी बचाव -बेटी पढाव, रक्त दान - श्रेष्ठ दान, मुलगी शिकली-प्रगती झाली, पोलीस आपले मित्र आहे, स्त्रीभ्रूण हत्या रोखा आदी समाजप्रबोधनपर घोषणा देत जनजागृती करण्यात आली. यावेळी खालचीपेठ परिसरात मानाच्या साई मंदीरात पालखी निमित्त साई भक्तांची मोठी गर्दी झाली होती. या पालखी सोहळ्याचे संयोजन निखिल बोंडे, मयुर मेठी, नितीन चांदवडकर, नितीन पवार, संदीप कदम, सागर सदगुरु , दिनेश मालवीया, बंटी कर्पे, मुन्ना बोहरी, निखिल कर्पे, सुदर्शन ढोन्नर आदींनी केले.