शिर्डीची विमानसेवा नाशिकसाठी उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:15 AM2017-10-24T01:15:18+5:302017-10-24T01:15:23+5:30

सुवर्ण त्रिकोणातील नाशिक म्हणून या शहराचे महत्त्व अबाधित असले तरी येथून अद्याप हवाई सेवा सुरू झालेली नाही. ही सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच केंद्र सरकारने शिर्डीच्या विमानतळाला प्राधान्य दिले आणि येथून सेवा सुरू झाली. शिर्डीच्या विमानतळामुळे नाशिकच्या हवाई सेवेचा प्राधान्यक्रम आता हटला असला तरी यातूनही मार्ग काढता येईल. नाशिक-शिर्डीदरम्यान वाहतुकीसाठी एक्स्प्रेस कॉरीडॉर केल्यास नाशिकच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळू शकेल.

 Shirdi flight is useful for Nashik | शिर्डीची विमानसेवा नाशिकसाठी उपयुक्त

शिर्डीची विमानसेवा नाशिकसाठी उपयुक्त

Next

धैर्यशील वंडेकर।
सुवर्ण त्रिकोणातील नाशिक म्हणून या शहराचे महत्त्व अबाधित असले तरी येथून अद्याप हवाई सेवा सुरू झालेली नाही. ही सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच केंद्र सरकारने शिर्डीच्या विमानतळाला प्राधान्य दिले आणि येथून सेवा सुरू झाली. शिर्डीच्या विमानतळामुळे नाशिकच्या हवाई सेवेचा प्राधान्यक्रम आता हटला असला तरी यातूनही मार्ग काढता येईल. नाशिक-शिर्डीदरम्यान वाहतुकीसाठी एक्स्प्रेस कॉरीडॉर केल्यास नाशिकच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळू शकेल.  नाशिकमध्ये ओझर येथे विमानतळ बांधून सज्ज आहे, परंतु येथून विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. ही सेवा सुरू व्हावी यासाठी अनेक संस्था तसेच उद्योग संस्था प्रयत्नशील आहेत. नाशिकसह राज्यातील आणि देशातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी केंद्र सरकारने उडान म्हणजे उडे देश का आम नागरिक ही सेवा सुरू केली आहे. त्यानुसार देशातील ४१४ विमनातळ व विमान सेवेसाठी असलेल्या धावपट्ट्या अधिसूचीत केल्या आहेत. महाराष्टÑातील २९ धावपट्ट्यांचा त्यात समावेश आहे. राज्य सरकारने नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, जळगाव, गोंदिया, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या नऊ शहरांना प्राथमिकता दिली होती. त्यानुसार नांदेडला ही सेवा सुरू झाली असून, नाशिकमध्ये ओझर येथून सेवा सुरू करण्यासाठी एअर डेक्कन कंपनीने स्वारस्य दाखवले होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही सेवा सुरू असणे आवश्यक असतानाही मुंबईच्या विमानतळावर आवश्यक असलेले स्लॉट म्हणजेच लॅँडिंग आणि टेक आॅफसाठी निर्धारित वेळ न मिळाल्याने ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही. नाशिकला मुंबईत वेळ मिळेल न मिळेल परंतु तोपर्यंत नाशिक ते पुणे सेवा सुरू करण्याची गरज असून त्यासाठी पाठपुरावा केला तर किमान विमानतळ सुरू होऊ शकते.  शिर्डी येथे सुरू झालेल्या सेवेमुळे आता नाशिकचे नाव मागे पडले आहे. नाशिकचे महत्त्व पटविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न झाले नाहीत. सरकारही कमी पडले हे स्पष्ट होते. शिर्डीच्या सेवेचा नाशिकवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा नाशिकला लाभ मिळवून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शिर्डीतील विमानसेवेमुळे हॉटेल, रेस्तरॉँ, पर्यटन, कार रेंटल्स, मिटिंग्ज, कॉन्फरन्स यांसह इतर उद्योग धंद्यांसाठी नाशिककरांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात पुढाकार घेऊन नाशिक- शिर्डीसाठी एक्स्प्रेस कॉरीडॉर बनविल्यास या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. तसेच व्यावसायिक सुसंघटित पद्धतीने शिर्डीला विमानाने येणाºया भाविकांना छोट्या अवधित नाशिकमधील जास्तीत जास्त धार्मिक व पर्यटन ठिकाणे दाखविण्यासाठी एखादे किफायतीर शिर्डी एअरपोर्ट- नाशिक शिर्डी एअरपोर्ट पॅकेज तयार केल्यास ते लोकप्रिय ठरू शकते.  शिर्डीहून विमानसेवा सुरू करणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु नाशिकच्या शाश्वत व दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने येथून मोठ्या क्षमतेची विमानसेवा असणे यास कोणत्याही प्रकारचा पर्याय ठरूच शकत नाही.  (लेखक हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

Web Title:  Shirdi flight is useful for Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.