नांदूरवैद्य येथील भाविकांचे शिर्डीत स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 02:07 PM2020-02-04T14:07:02+5:302020-02-04T14:07:14+5:30

नांदुरवैद्य : येथील साईबाबा पालखी पदयाञेतील भाविकांनी श्री क्षेञ शिर्डी येथे स्वच्छता मोहीम राबविली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या पदयाञेत युवक तसेच महिलांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

 Shirdi Sanitation Campaign of devotees at Nandurvadi | नांदूरवैद्य येथील भाविकांचे शिर्डीत स्वच्छता अभियान

नांदूरवैद्य येथील भाविकांचे शिर्डीत स्वच्छता अभियान

googlenewsNext

नांदुरवैद्य : येथील साईबाबा पालखी पदयाञेतील भाविकांनी श्री क्षेञ शिर्डी येथे स्वच्छता मोहीम राबविली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या पदयाञेत युवक तसेच महिलांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
नांदुरवैद्य येथील युवकांनी नऊ वर्षापासून सुरु केलेल्या या स्वच्छता मोहिमेत साईबाबा मंदिर परिसर, द्वारकामाई, साईबाबांची चावडी तसेच मुख्य मंदिर रस्ता आदी ठिकाणी हा उपक्र म राबवत आहे. याआधी देखील या युवकांनी विश्रामगड, शिवनेरी, सिंहगड आदी.महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली आहे. याच पाशर््वभूमीवर शिर्डी येथील साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत नांदूरवैद्य व वाघेरे येथील भाविकांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता करत परिसर उजळून टाकला. शिर्डी परिसरातील रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या एकञ करत साफसफाई झाल्यानंतर कच-याची योग्य ठिकाणी विविल्हेवाट लावण्यात आली.यापुढील काळात देखील महाराष्ट्रातील इतर तिर्थक्षेत्री जाऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे या पदयाञेत सहभागी झालेल्या भाविकांनी यांनी बोलुन दाखवले. या मोहिमेत विजय भोर, देविदास काजळे, गणेश मुसळे, सुनिल मुसळे, नवनाथ कर्पे, सुधाकर बोराडे, रोहिदास सायखेडे, तुकाराम काजळे, संदिप पवार, दिपक जोशी, विकास गाढवे, दिपाली मुसळे, डॉ. संदिप वायकोळे, श्रीमती वायकोळे, अशोक काजळे, रामा काजळे, गणपत भागवत, अक्षय गाढवे, संतोष दिवटे, आकाश मुसळे, लक्ष्मण पूंजा मुसळे, वैभव भगत, मंगला नाठे, संतोष मुसळे आदींसह भाविक सहभागी झाले होते.

Web Title:  Shirdi Sanitation Campaign of devotees at Nandurvadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक