जुन्या नाशकात शिरकाव : शहरात तीन कोरोनाबाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:03 PM2020-05-15T21:03:00+5:302020-05-15T21:04:24+5:30

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी (दि.१५) कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ७७५ वर पोहचला तर शहराची रुग्णसंख्या ४५ इतकी झाली.

Shirkao in old Nashik: Three coronary arthritis patients in the city | जुन्या नाशकात शिरकाव : शहरात तीन कोरोनाबाधित रूग्ण

जुन्या नाशकात शिरकाव : शहरात तीन कोरोनाबाधित रूग्ण

Next
ठळक मुद्देशहराची रुग्णसंख्या ४५ इतकीमहपालिका प्रशासनाला युध्दपातळीवर प्रयत्न करावे लागणार

नाशिक : शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या अहवालात महापालिका हद्दीतील जुने नाशिक, गोसावीवाडी, नाशिकरोड आणि दसक-पंचक जेलरोड या भागात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशकात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. या दाट लोकवस्तीत कोरोनाने प्रवेश करू नये, असे प्रत्येक नाशिककराला वाटत होते; मात्र सातपूर येथील त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपकर् ात आलेली कुंभारवाड्यात राहणारी एक महिला कोरोनाबाधित आढळून आली.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी (दि.१५) कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ७७५ वर पोहचला तर शहराची रुग्णसंख्या ४५ इतकी झाली. शुक्रवारी जिल्ह्यात १७ नवे रुग्ण आढळून आले. मालेगावची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६०२ झाली तर नाशिक ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा ९८ वर पोहचला आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने मोठा कुंभारवाडा व आजुबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी कुठल्याही सबबीवर घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क बांधावा व हात वारंवार धुवावेत असे आवाहन करण्यात आले आह.
जुन्या नाशकातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेला परिसर म्हणून मोठा कुंभारवाडा, लहान कुंभारवाडा, नाईकवाडीपुरा, काजी गढीचा भाग ओळखला जातो. या भागात अत्यंत जवळजवळ व लहान-लहान घरे आहेत. अगदी दाट वस्तीच्या या परिसरात अरुंद गल्ली-बोळ असून या भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी महपालिका प्रशासनाला युध्दपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहे. महापालिका आरोग्य विभागासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे. मनपा प्रशासनाला स्थानिक नागरिकांची साथ मिळणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. एकूणच आता जुने नाशिककरांनी उदासिनता सोडून अधिकाधिक गंभीर होत खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच नागरिक पुन्हे बेफिकिर होऊन रस्त्यांवर वावरताना दिसून येत असून ही शहरासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शहरातील पोलीस बंदोबस्तदेखील पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कमी केला आहे. केवळ शहराच्या सीमांवर आता पोलिसांचा कडा पहारा आहे. दुसºया शहरांमधून चोरट्या मार्गाने नाशिक शहराच्या सीमेत कोणीही प्रवेश करणार नाही, याबाबत पोलीस अधिक खबरदारी घेत आहे.
नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच नागरिकांचे जत्थे शहरात पहावयास मिळत आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान शहरातील बाजारपेठांचा परिसर गजबजून जात आहे.

 

 

Web Title: Shirkao in old Nashik: Three coronary arthritis patients in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.