शिरवाडे उपसरपंचास शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 06:45 PM2018-10-28T18:45:45+5:302018-10-28T18:46:14+5:30
लासलगाव : शिरवाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील फेव्हर ब्लॉकचे नित्कृष्ठ काम पाहणी करण्यास गेलेल्या उपसरपंच संदीप आवारे यांना संबंधित ठेकेदाराचा येथील नातेवाईक असलेल्या आण्णा बाबुराव शिंदे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी संदीप आवारे यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत,येथील प्रा.शाळा प्रांगणात जि.प सेस मधून सिमेंट गट्टे बसविण्याचे नित्कृष्ठपणे घाईघाईत काम सुरू होते,ग्रामस्थांच्या तक्र ारी वरून मी व शालेय व्यवस्थापन कमेटीचे अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे सदर काम पाहण्यास गेलो असता आरोपी आण्णा बाबुराव शिंदे यांनी तुझा इथे काय संबंध, असे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व तालुक्याच्या गावांपर्यंत कसा पोहोचतो तेच बघतो असा दम दिल्याचे म्हटले आहे. संदीप आवारे यांच्या तक्र ारीवरून लासलगाव पोलीस ठाण्याते गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. उंबरे करीत आहेत.
या प्रकरणामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून गावात निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. येथील दशक्रि या शेडचे व सदर सिमेंट गट्यांचे नित्कृष्ठ होत असलेल्या कामांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी आरोपीस कडक शासन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.