अवघ्या एका तासातच संपली ‘शिवभोजन थाळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:08 AM2020-01-28T00:08:17+5:302020-01-28T00:15:09+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीनच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या महाराष्टÑ शासनाच्या शिवभोजन थाळीला दुसºया दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या दुसºया दिवशीच अवघ्या तासाभरात १५० थाळी संपल्याचे दिसून आले.
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीनच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या महाराष्टÑ शासनाच्या शिवभोजन थाळीला दुसºया दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या दुसºया दिवशीच अवघ्या तासाभरात १५० थाळी संपल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या थाळीसाठी सकाळी ११ वाजेपासूनच अनेक गरजूंनी रांगा लावल्याचे दिसून आले. शहरातील अन्य केंद्रांमध्येदेखील शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.
प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ठिकाणी शिवभोजन थाळीचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील या योजनेला पहिल्या दिवसांपासून चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेचे कॅन्टीन, पंचवटीतील बाजार समिती येथील बळीराजा रेस्टॉरंट व नाशिकरोड रेल्वेस्थानक बाहेरील दीपक रेस्टारंट या तीन ठिकाणी शिवभोजन थाळीला सुरुवात झाली. मालेगावला बाजार समितीत येथील केंद्रालाही सुरुवात झाली. प्रत्येक केंद्राला दिवसाला दीडशे थाळीची मर्यादा देण्यात आली आहे.
शिवभोजन योजनेच्या शुभारंभानंतर दुसºया दिवशी सर्वच केेंद्रांवर लाभार्थ्यांची गर्दी दिसून आली. विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील केंद्रावर सकाळी ११.३० वाजेपासूनच रांग लागली होती. थाळींची तसेच वेळेचीही मर्यादा असल्याने प्रथम येणाºयास प्राधान्य याप्रमाणे योजनेचा लाभ दिला जात असल्याने पहिल्या तासाभरातच १५० थाळींचा कोटा पूर्ण झाला. त्यामुळे अन्य लोकांना माघारी परतावे लागले. या योजनेच्या शुभारंभापासून थाळीविषयीची चर्चा सुरू असून, या थाळीचाआस्वाद घेण्यासाठी दुसºया दिवशी विशेष गर्दी दिसून आली. पहिल्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा असल्याने आणि या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यामुळे अनेकदा केंद्रापर्यंत पोहोचता आले नव्हते. दुसºया दिवशी मात्र सकाळी ११ वाजेपासूनच केंद्राबोहर लाभार्थी दिसून आले.
शुभारंभाच्या दिवशी जिल्ह्यातील चारही केंद्रांवरील ६०० थाळींपैकी ५५९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यानुसार शहरातील तीनही केंद्रांवरील शिवभोजन थाळी मिळवण्यासाठी गर्दी दिसून आली. मालेगावला मात्र पहिल्या दिवशी ११७ लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. शहरातील तीनही केंद्रांवर दुसºया दिवशीदेखील सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. लाभाार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांना रांगेत कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.