सिन्नर शहर व तालुक्यात शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:26 AM2021-02-21T04:26:39+5:302021-02-21T04:26:39+5:30
कोकाटे संपर्क कार्यालयात कार्यक्रम सिन्नर : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार ...
कोकाटे संपर्क कार्यालयात कार्यक्रम
सिन्नर : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, नगरसेवक रामभाऊ लोणारे, मल्लू पाबळे, संतोष शिंदे, नगरसेवक मालती भोळे, शीतल कानडी, राजाराम मुरकुटे, रवींद्र काकड, अरुण जाधव, संदीप शेळके, आनंदा सालमुठे, प्रवीण कोकाटे, सचिन देशमुख आदी उपस्थित होते.
-----------------
दापूर येथे कार्यक्रम
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, सरपंच सोमनाथ आव्हाड, कचुनाना आव्हाड, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश आव्हाड, झुंबर बोडके, भीमा आव्हाड, ग्रामसेवक बुरसे, शिपाई सूर्यवंशी, शिवाजी आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------
पांढुर्लीत शिवजयंती साजरी
सिन्नर : पांढुर्ली येथील मविप्र संचलित जनता विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सामूहिकपणे साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका व्ही.पी. उकिरडे, पर्यवेक्षक व्ही.एन. शिंदे यांनी रथसप्तमीनिमित्त प्रथम उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून अर्ध्य दिले. योगशिक्षक विलास गोसावी यांनी सूर्यनमस्काराचे मंत्र म्हणत विद्यार्थी, सेवक व कर्मचारी वृंदाबरोबर सामूहिकपणे सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष मुख्याध्यापिका उकिरडे यांनी केले.
‘पाताळेश्वर’मध्ये वक्तृत्व स्पर्धा
सिन्नर : पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवरायांवर उक्तृत्व केल्याबद्दल प्राजक्ता शिंदे, निकिता पोटे, सुजल शिंदे आदींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी उपशिक्षक बी.आर. चव्हाण, आर.व्ही. निकम, एस.एम. कोटकर, आर.टी.गिरी, एम.सी. शिंगोटे, एम.एम. शेख, सविता देशमुख, टी.के. रेवगडे, सी.बी. शिंदे आदी उपस्थित होते.
भाजपच्या वतीने अभिवादन
सिन्नर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, सरचिटणीस किशोर देशमुख, उपतालुकाध्यक्ष कृष्णा दराडे, आर.के. सांगळे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, सचिन गोळेसर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी- सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. दीपक श्रीमाळी आदींसह कार्यकर्ते. (२० सिन्नर बीजेपी)
===Photopath===
200221\20nsk_16_20022021_13.jpg
===Caption===
२० सिन्नर बीजेपी