शिवसैनिकांनी केले पाचशे बाटल्यांचे रक्तसंकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:19+5:302021-05-18T04:15:19+5:30
शहरातील धम्म चौक (तिडके काॅलनी) येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर ...
शहरातील धम्म चौक (तिडके काॅलनी) येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. शहर शिवसेना, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे आतापर्यंत शालीमार कार्यालय ४७, त्रिमूर्ती चौक (सिडको) ६५, सार्वजनिक वाचनालय (औरंगाबादकर सभागृह) १२५, पंडित कॉलनी (कॉलेज रोड) ७२, द्वारका ५४ व शंकरनगर ४७ अशा प्रकारे ८ ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांत ५०० पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहे, असेही बडगुजर यांनी पुढे नमूद केले.
तिडके कॉलनीत आयोजित शिबिरात आदित्य देवकुटे, प्रणव लोणकर, रोहित लोणकर, प्रतीक लोणकर, भूषण बोरसे, अजिंक्य कटाले, हार्दिक कुमठ, अथर्व सोनवणे, चाणक्य भाटिया, तुषार धनवटे आदींनी रक्तदान केले. यावेळी युवा सेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, शिवसेना मध्य नाशिक शहर संघटक वीरेंद्रसिंग टिळे, जिल्हा कार्यालयप्रमुख राजेंद्र वाकसरे, युवा सेना उपमहानगर प्रमुख किरण पाटील, सोमनाथ गुबाडे, मोहन सुतार, प्रवीण गुंभाडे, सागर कर्डक, प्रशांत चंद्रात्रे आदी उपस्थित होते.