भुजबळांपुढे शिवसैनिकांनी वाचला तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 06:20 PM2019-07-27T18:20:50+5:302019-07-27T18:21:07+5:30
लासलगाव : विविध समस्या सोडविण्याची मागणी
लासलगाव : येथील कोटमगाव रोड व विंचूर-प्रकाशा महामार्गावरील सर्व्हीस रोड व इतर समस्यांबाबत लासलगाव येथील शिवसैनिकांनी आमदार छगन भुजबळ यांच्यापुढे तक्र ारीचा पाढा वाचला.
लासलगाव येवला मतदार संघातील लासलगाव येथे कोटमगाव रोड वरील व विंचूर-प्रकाशा महामार्गावरील रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कॉंक्रि टीकरण झाले असून सदर काम पूर्ण होऊन सात ते आठ वर्षे झालेले आहे पण अद्यापही विंचूर-प्रकाशा महामार्गावरील गटारीची कामे पूर्ण झालेली नाहीत. कोटमगाव रोड वरील रस्त्यांच्या साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. कॉंक्र ीट रस्त्यामुळे रस्ता साधारण एक फूट उंच झालेला आहे व एका बाजूचे गटारीचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तसेच डासांचे प्रादुर्भाव वाढला आहे. गटारींवर ढापे नाहीत. ढापे न टाकल्यामुळे व साईट पट्टया न भरल्यामुळे सदर ठिकाणी छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याला गावातील नागरिकांनी तक्र ार केली असता कुठलेही पाऊल उचलले नाही तसेच सदर साईडपट्ट्या भरण्याची सूचना अद्याप पर्यंत सदर ठेकेदारास दिली नसल्याची तक्रारही यावेळी शिवसैनिकांनी केली. या वेळी जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप,उपतालुका प्रमुख सोमनाथ गांगुर्डे,बाळासाहेब शिरसाठ,सुनिल आब्बड,गणेश इंगळे,प्रमोद पाटील,संदीप उगले,अभिनव भंडारी,मयुर झाम्बरे,महेश बकरे,सुमंत कारवाळ,जितेंद्र फापाळे,बापु कुशारे,सुरज श्रीवास्तव,आप्पा साखरे,गिरीष साबद्रा,विक्र म शिंदे,निलेश वडनेरे आदी उपस्थित होते. भुजबळ यांनी शिवसैनिकांचे म्हणणे ऐकून कार्यवाहीचे आश्वासन दिले.