कळवण तालुक्यात शिवसंपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 11:11 PM2021-07-22T23:11:15+5:302021-07-23T00:47:53+5:30

कळवण : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात अभोणा जि. प. गटातील नांदुरीपासून पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

Shiv Sampark Abhiyan in Kalvan taluka | कळवण तालुक्यात शिवसंपर्क अभियान

अभोणा येथे शिवसंपर्क अभियानप्रसंगी सुनील पाटील अंबादास जाधव, दशरथ बच्छाव, कारभारी आहेर, संभाजी पवार, डॉ. दिनेश बागूल, राजू वाघ, विनोद भालेराव, वसंत देसाई, गिरीश गवळी, शीतलकुमार अहिरे, डॉ. पंकज मेणे, चिंतामण निकुंभ आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी जनतेला दिलासा देण्याचे काम सरकारने केले

कळवण : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात अभोणा जि. प. गटातील नांदुरीपासून पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी लोकाभिमुख निर्णय घेतले आहे. खावटी योजना बंद पडली होती. पुन्हा अनुदान स्वरूपात ती योजना सुरू करून आदिवासी जनतेला दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थीला लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, उपतालुकाप्रमुख डॉ. दिनेश बागूल, राजू वाघ, विनोद भालेराव, वसंत देसाई, गिरीश गवळी, विभागप्रमुख शीतलकुमार अहिरे, डॉ. पंकज मेणे, चिंतामण निकुंभ, युवासेना तालुकाधिकारी मुन्ना हिरे, नवनाथ बेनके, नाना देवरे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Shiv Sampark Abhiyan in Kalvan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.